MP Omraje Nimbalkar  Sarkarnama
मराठवाडा

MP Omraje Nimbalkar News: केंद्राने सन्मानित केलेल्या अर्चना मानेंचा आम्हाला अभिमान..

Marathwada : धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांनी `वन एक्कर` मॉडेलची संकल्पना राबविली होती.

सरकारनामा ब्युरो

Dharashiv : सेंद्रीय शेती, वनीकरण, दुष्काळ निवारण, विधवा, परित्यकत्या व शेतकरी महिलांचे पुनर्वसन क्षेत्रात उल्लेखनीय काम करत ६५ हजार महिलांचे जाळ निर्माण करणाऱ्या जिल्ह्यातील अनसुर्डा येथील अर्चान माने यांचा केंद्र सरकारकडून नुकताच सन्मान करण्यात आला. (Mp Omraje Nimbalkar News) केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

हा मराठवाडा आणि माझ्या धाराशीव लोकसभा मतदारसंघासाठी मोठा अभिमानाचा क्षण आहे. ताईंनी केलेल्या कार्याची दखल देशपातळीवर घेतल्याबद्दल मला त्यांचा अभिमान आणि त्यांच्या कार्याबद्दल आदर वाटतो, अशा शब्दात खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी अर्चना माने यांचे कौतुक केले. या यशाबद्दल ओमराजे यांनी त्यांच्या सत्कार देखील केला.

अर्चना माने ह्या स्वयंशिक्षण प्रयोगच्या माध्यमातून सन २००७ पासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. सन २०१२ ते २०१६ या कालावधीत धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांनी `वन एक्कर` मॉडेलची संकल्पना राबविली होती. (Osmanabad) शेतीमध्ये नुकसान झाले तरी भरपाई मिळावी अशी त्यामागील संकल्पना होती. (Shivsena) शेतीबरोबरच सेंद्रीय शेती, विधवा, परित्यक्ता व शेतकरी महिलांचे पुनवर्सन अशा विविध क्षेत्रात त्या कार्यरत आहेत.

शेतकरी महिलांनी पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय अशा जोडधंद्यांच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय करून उन्नती साधावी, असे आवाहन माने सातत्याने करत असतात. आजवर त्यांनी गुजरात, केरळ, ओडिसा, तसेच महाराष्ट्रातील सातारा नांदेड त्याबचरेाबर धाराशिव, कळंब, वाशी व इतर तालुक्यांमध्ये मार्गदर्शन केलेले आहे.

सध्या त्यांनी ६५ हजार महिलांचे नेटवर्क उभारले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव केंद्र सरकारने केला, पण जिल्ह्यातील भगिनी म्हणून त्यांच्या सत्कार आणि कौतुक करणे हे माझे देखील कर्तव्य असल्याचे ओमराजे म्हणाले. यावेळी भाजपा नेते जीवनराव देशमुख, अनसुर्ड्याचे माजी सरपंच अरूण माने,पांडूरंग माने व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT