Sanjay Jadhav Meet Manoj Jarange  sarkarnama
मराठवाडा

Sanjay Jadhav Meet Manoj Jarange : खासदार संजय जाधवांकडून डॅमेज कंट्रोल, मनोज जरांगे पाटलांची घेतली भेट, म्हणाले, 'मराठा समाजाच्या न्याय्य ...'

Manoj Jarange Hospital Sanjay Jadhav : मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत आंदोलन सुरू असताना खासदार संजय जाधव यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, रविवारी जाधव यांनी जरांगे पाटील यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

Roshan More

Sanjay Jadhav News : अंतरवाली सराटीत आंदोलन सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांनी खासदार संजय जाधव यांना फोन केला होता. जाधव यांनी आयोजित केलेला कार्यक्रम रद्द करण्यास त्यांनी सांगितले होते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित होत असलेला हा कार्यक्रम रद्द न करण्याची भूमिका जाधव यांनी घेतली होती.

जरांगे पाटील यांनी जाधव आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर त्यावेळी जोरदार टीका केली होती. जाधव हे मराठ्यांच्या मतांवर निवडून येतात, असे इशारा देखील त्यांनी दिला होता. दरम्यान, आता जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी खासदार संजय जाधव यांनी रुग्णालयात जात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि काळजी घेण्याचा आग्रह केला. तसेच मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी अविरत संघर्ष करणाऱ्या मनोजदादांना आई तुळजाभवानी मातेच्या कृपेने लवकर पूर्ण आरोग्य लाभावे, असे म्हटले.

जाधवांकडून डॅमेट कंट्रोल?

खासदार जाधव यांनी दुष्काळाचा आढवा घेणाऱ्या बैठकीत काजू-बदामावर ताव मारला. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यातच त्यांनी आधी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली सूचना न जुमानता उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मेळावा घेतला होता. त्यामुळे मराठा समाजात देखील नाराजी होती. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT