Parbhani : खासदार संजय जाधव यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याचा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली. विशेष म्हणजे दीड वर्षापुर्वी देखील त्यांनी असाच आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीचे पुढे काय झाले हे गुलदस्त्यात असतांनाच पुन्हा जाधव (Sanjay Jadhav) यांनी दुसऱ्यांदा आपल्याला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याचा आरोप केल आहे.
एका गॅंगला आपल्याला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याचा आरोप करत स्वत: खासदार संजय जाधव यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक व थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. (Parbhani) यापूर्वी नांदेड येथील रिंधा गॅंगकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप करत जाधव यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. (Shivsena)
दोन दिवसापूर्वी एका फोनद्वारे आपल्याला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्या फोनवरून खबऱ्याने त्यांना आपणास जीवे मारण्यासाठी ३ कोटी रुपयांची सुपारी देऊ केली असल्याचे जाधव यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले. या संदर्भात आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.
परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलिस अधिक्षक रागुसधा आर. यांच्याकडेही या संदर्भात आपण बोललो असल्याचे जाधव यांनी सांगितले. आपले कुणाशीही वैर नाही. कुणाच्या व्यवहारात आपला हस्तक्षेप नाही, असे असतांनाही आपण कुणावर संशय घ्यावा? हा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, दीड वर्षापुर्वी खासदार जाधव यांनी परभणी पोलीसामध्ये आपल्याला जीवे मारण्याचे धमकीचे फोन येत असून त्यासाठी १ कोटी रुपयांची सुपारी दिल्याची तक्रार दिली होती. लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे फोनवरून थेट जीवे मारण्याची धमकी आल्याने पोलीसांनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतले.
स्वतः जाधव यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांना फ्री हॅन्ड देण्याची विनंती केली होती. नांदेड पोलीसांनी देखील विशेष पथक स्थापन करून काही संशयितांना अटक केली. पण पुढे या प्रकरणाची चर्चाच बंद झाली. स्वतः जाधव आणि नांदेड, परभणी पोलीसांनी देखील या प्रकरणावर काहीच भाष्य किंवा माहिती दिली नाही. त्यामुळे त्या आधीच्या सुपारी प्रकरणाचे काय झाले? याची देखील चर्चा या निमित्ताने होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.