Chandrakant Patil-Imtiaz Jaleel Sarkarnama
मराठवाडा

कुणी काय करावे हे खासदारांनी शिकवू नये? त्यांनी लोकवर्गणीतून शाळा उभारावी..

सैनिकी शाळा उभारायची असले तर त्यासाठी लोकवर्गणी उभारता येईल, खासदारांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, आम्ही देखील त्यात आमचा वाटा उचलू. (Chandrakant Patil)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्यात महापुरुषांच्या पुतळ्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. औरंगाबादेत महाराणा प्रतापांचा पुतळा उभारण्याला एमआयएमचे (Aimim) खासदार इम्तियाज जलील (Mp Imtiaz Jalil) यांनी विरोध दर्शवला. या पैशातून राष्ट्रीय सेवेसाठी सैनिकी शाळा सुरू करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला. (Chnadrakant Patil) यावरू शिवसेना विरुद्ध एमआयएम असा संघर्ष सुरू झाला आहे.

शिवसेनेने कुठल्याही परिस्थिती पुतळा उभारणारच, आम्हाला रोखून दाखवा असा इशारा दिला आहे. या वादात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील उडी घेतली आहे. कुणी काय करावे हे खासदारांनी सांगू नये, तुम्हाला शाळा उभारायची असले तर लोकवर्गणीतून उभारा आम्ही त्यात वाटा उचलू, असा टोला पाटील यांनी इम्तियाज जलील यांना लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयती निमित्त शिवसैनिकांना उद्देशून काल केलेल्या भाषणावर पाटील यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. यावेळी औरंगाबादेत महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरून शिवसेना व एमआयएम यांच्यात निर्माण झालेल्या वादाने जातीय तणाव वाढेल का? खासदारांनी पुतळ्या ऐवजी सैनिकी शाळा काढण्याची मागणी केली आहे?

याकडे पाटील यांचे लक्ष वेधले. यावर पाटील म्हणाले, पुतळ्यावरून जातीय दंगल किंवा तणाव निर्माण होईल असे काही नाही. मुळात कुणी काय करावे हे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगण्याची गरज नाही. महापुरुषांचे पुतळे उभारले जातात, कधी ते लोकवर्गणीतून, प्रशासनाच्या माध्यमातून उभारले जातात.

तेथील प्रशासन आणि जनता ते ठरवेल. खासदारांनी त्यात लुडबूड करू नये. सैनिकी शाळा उभारायची असले तर त्यासाठी लोकवर्गणी उभारता येईल, खासदारांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, आम्ही देखील त्यात आमचा वाटा उचलू, अशा शब्दांत पाटील यांनी इम्तियाज जलील यांची मागणी उडवून लावली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT