Devendra Fadanvis- Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

Mumbai : फडणवीस मंत्रीमंडळात कोण कोण ? शिंदे गटाला मिळणार झुकते माप ..

ज्या शिंदे गटाच्या बंडामुळे फडणवीस यांचे पुन्हा येण्याचे स्वप्न पुर्ण झाले, त्या एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद व त्यांच्या सोबतच्या १३ ते १४ जणांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात येणार आहे. (Devendra Fadanvis)

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० व अपक्षांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश कामय ठेवत बहुमत चाचणी घेण्यास सांगितल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राजीनामा दिला. केवळ मुख्यमंत्रीपदाचाच नाही, तर विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देखील त्यांनी रात्री उशीरा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवला. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारच्या स्थापनेला वेग आला आहे.

उद्या नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व काही आमदार आज मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नव्या मंत्रीमंडळात (Bjp) भाजपचे २५ ते ३० मंत्री तर एकनाथ शिंदे गटाचे १४ ते १५ मंत्री असतील असे देखील बोलले जात आहे. या संभाव्य मंत्र्यांची नावे देखील समोर येत आहेत.

देवेंद्र फडणवीस हे गेल्यावेळी प्रमाणेच मुख्यमंत्रीपदासह गृह व सामान्य प्रशासन हे खाते आपल्याकडेच ठेवतील अशी माहिती आहे. या शिवाय ज्या शिंदे गटाच्या बंडामुळे फडणवीस यांचे पुन्हा येण्याचे स्वप्न पुर्ण झाले, त्या एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद व त्यांच्या सोबतच्या १३ ते १४ जणांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्यांची पुन्हा फेरनिवड होऊ शकते, असे देखील बोलले जाते.

भाजपचे संभाव्य मंत्री..

भाजपच्या मंत्रीमंडळातील संभाव्य आमदारांची नावे समोर येत आहेत, यात प्रामुख्याने गणेश नाईक, रविंद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, नितेश राणे, आशिष शेलार, संजय कुटे, मदन येरावार, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, संदीप धुर्वे, रणजीत सावरकर, अतुल सावे, संभाजी निलंगेकर, राणा जगजीतसिंह पाटील, मेघना बोर्डीकर,चंद्रकांत पाटील, राहुल कुल, महेश लांडगे, जयकुमार गोरे, राम सातपुते, रणजीत मोहिते पाटील, सुभाष देशमुख, विजय देशमुख, गोपीचंद पडळकर,गिरीश महाजन, जयकुमार रावल, राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, देवयानी फरांदे यांचा समावेश होऊ शकतो.

शिंदे गटातून यांची नावे चर्चेत

तर शिंदेगटातून स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासह अनिल बाबर, शंभुराज देसाई, संजय शिरसाट, तानाजी सावंत, दिपक केसरकर, गुलाबराव पाटील, दादा भुसे, सदा सरवणकर, प्रकाश अविटकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शहाजी बापू पाटील, बच्चू कडू, भरत गोगावले, राजेंद्र यड्रावकर, लता सोनवणे, मंजुळा गावीत यांच्या नावांचा देखील विचार होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT