Beed Political News : परळी येथील वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे सर्व 13 उमेदवार विजयी झाले आहेत. 17 संचालक मंडळासाठी चार उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित 13 जागांसाठी शनिवारी मतदान आणि आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व 13 जागा जिंकत पंकजा मुंडे-धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विरोधी पॅनलचा धुव्वा उडवला.
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे वैद्यनाथ अर्बन बँकेवर वर्चस्व कायम राहिले आहे. मंत्री पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे सर्वच्या सर्व म्हणजे तेरा उमदेवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पॅनलचा दारूण पराभव झाला.
वैद्यनाथ बँक संचालक मंडळाच्या 17 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनल रिंगणात उतरले होते. (Parli) या पॅनलच्या चार जागा या अगोदरच बिनविरोध निवडून आल्या आहेत, त्यात माजी खासदार डॉ.प्रीतम मुंडे, अनिल तांदळे, डाॅ विनोद जगतकर आणि माधुरी मेनकुदळे यांचा समावेश होता. संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी परळीपासून मुंबईपर्यंतच्या 36 मतदान केंद्रावर शनिवारी मतदान पार पडले.
विजयी उमेदवार
बीड येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मंगळवारी दुपारी सर्व तेरा जागांचे निकाल हाती आले, यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले. विजयी उमेदवारांमध्ये विनोद सामत, प्रकाश जोशी, डाॅ राजाराम मुंडे, संदीप लाहोटी, प्रवीण देशपांडे, महेश्वर निर्मळे, विजय वाककेर, अमोल डुबे, कुलभूषण जैन, राजेंद्र लोमटे, सुशांत लोमटे, मनमोहन कलंत्री, रमेश कराड यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.