Municipal commissioner News Sarkarnama
मराठवाडा

Municipal commissioner News : आयुक्तांचा वाढदिवस भारी, पण त्याची चर्चाच न्यारी...

सरकारनामा ब्युरो

Marathwada : वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर क्षण. मित्र-मंडळी, आप्तेष्ट आणि कुटुंबियासह तो साजरा करण्याची मजाच काही और असते. (Municipal commissioner News) राजकीय नेत्यांचे वाढदिवस जंगी होतात, पण एखाद्या प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा अधिकार तो ही कार्यालयात मोठ्या थाटामाटात झाल्याची उदाहरणे क्वचितच पहायला मिळतात. प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना वैयक्तिक गोष्टींचे प्रदर्शन करायला आवडतं नाही.

छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त जी. श्रीकांत हे राज्यात आपल्या वेगळ्या कार्यशैली व संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखले जातात. सामाजिक भान जपणारा हा अधिकारी अचानक चुकला कसा? असा प्रश्न पडावा असा प्रकार त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात घडला. (Municipal Corporation) अर्थात वाढदिवसाचा बडेजाव करण्याची त्यांची इच्छा होती की नाही? हे कळाले नसले तरी महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आग्रह त्यांनी मोडला असता तर त्यांच्यावर टीका झाली नसती.

त्याचे झाले असे की, आयुक्त जी. श्रीकांत यांचा काल वाढदिवस होता. कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक वर्गणी जमा करून तो मोठ्या थाटामाटात करण्याचा निर्णय घेतला. (Marathwada) त्यासाठी महापालिकेच्या स्मार्ट सिटी कार्यालयात रेडकार्पेट टाकण्यात आले होते. फुले आणि फुंग्यांनी कार्यालय आणि रांगोळीने परिसर सजवण्यात आला होता. कापण्यासाठी भलामोठा केल आणि आयुक्तांचे कुटुंबिय या कार्यक्रमाला हजर होते.

वाढदिवस उत्साहात साजरा झाला, त्याचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आणि या वाढदिवसाची चर्चा सर्वसामान्यांमध्ये होवू लागली. एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने एवढा बडेजाव, गाजावाजा करत वाढदिव साजरा करावा का? ज्या शहरातील नारिकांना आठदिवसाआड प्यायला पाणी मिळते? इतर अनेक समस्या असतांना दोन-अडीच लाख खर्चून या थाटामाटाची खरंच गरज होती का? असा प्रश्न देखील उपस्थितीत केला जात आहे. जी.श्रीकांत यांनी आयुक्त म्हणून शहराचा कारभार हातात घेतला तेव्हापासून ते आपल्या चांगल्या कामांसाठी ओळखले जावू लागले.

विशेषतः त्यांनी दहावी-बारावीत नापास झालेल्या मुलांना ते खचू नये यासाठी आयोजित केलेल्या `फेल्यूअर पार्टी`ची चांगली चर्चा झाली होती. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक झाले. आपला खाजगी मोबाईल सार्वजनिक करणे, व्हाॅट्सअप क्रमाकांवर जनतेने आपल्या समस्या थेट माझ्याकडे पाठवाव्यात, अशा त्यांच्या अनेक उपक्रमाचे कौतुक होत असतांना या वाढदिवसाच्या निमित्ताने आता त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. कदाचित अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रेमाखातर त्यांनी होकार दिला असावा. पण हे टाळता आले असते तर अधिक चागंले झाले असते, अशी चर्चा या निमित्ताने होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT