Raosaheb Danve-Arjun Khotkar-Abdul Sattar Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : अब्दुल सत्तार यांना औरंगजेब म्हणणे चुकीचे, ते तुमच्या छाताडावर बसून निवडून आलेत..

नगर परिषदेची निवडणूक जवळ आहे, घोडा, मैदान समोर आहे तेव्हा कोण कोणाला खिशात घालते ते दिसेलच. (Shivsena)

सरकारनामा ब्युरो

जालना : आमचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा रावसाहेब दानवे यांनी औरंगजेब म्हणून उल्लेख केला. सर्वप्रथम मी याचा निषेध करतो, सत्तार (Abdul Sattar) यांना औरंगजेब म्हणण्याआधी ते तुमच्या छाताडावर बसून निवडून आले आहेत हे विसरू नका, असा पलटवार शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना लगावला. भाजपने काढलेला जल आक्रोश मोर्चा फुसका बार ठरला असून फडणवीसांसारखा मोठा नेता मोर्चाला आणला दीड हजार लोकं देखील मोर्चात नव्हते, असा आरोप देखील खोतकर यांनी केला.

जालन्याच्या (Jalna) पाणी प्रश्नावर भाजपच्या वतीने आज शहरातील मामा चौकातून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या मोर्चासाठी उपस्थितीत होते, तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व जिल्ह्याचे खासदार रावसाहेब दानवे हे देखील मोर्चात सहभागी झाले होते. तत्तपुर्वी पत्रकार परिषदेत बोलतांना दानवे यांनी अर्जून खोतकर व अब्दुल सत्तार यांचा उल्लेख करत टीका केली होती.

समोरासमोर येऊन टीका करण्याची हिमंत नसल्याने खोतकरांनी सिल्लोडहून भाड्याचा औरंगजेब माझ्या मागे लावून दिला आहे, पण निवडणुकीत मी या दोघांनाही खिशात घालीन, असे आव्हान दिले होते. या टीकेनंतर अर्जून खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांना प्रत्त्युतर दिले. प्रसार माध्यमांशी बोलतांना खोतकर म्हणाले, फडणवीस यांच्या सारखा मोठा नेता जल आक्रोश मोर्चासाठी शहरात आला, पण मोर्चात गर्दीच नसल्यामुळे हा फुसकाबार ठरला.

नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मोर्चा काढण्यात आला आहे. एकीकडे काॅंग्रेसशी सलगी करायची आणि दुसरीकडे त्याच काॅंग्रेसची सत्ता असलेल्या नगरपरिषदेच्या विरोधात मोर्चा काढायचा हे नाटक न समजण्याइतके लोक वेडे नाहीत. अब्दुल सत्तार यांचा उल्लेख दानवे यांनी औरंगजेब असा केला. एखाद्या मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीला औरंगजेब म्हणणे दानवेंना शोभत नाही, मी त्यांच्या विधानाचा निषेध करतो.

त्यांना आठवण करून देतो की ज्या सत्तारांना तुम्ही औरंगजेब म्हणत आहात, ते तुमच्या छाताडावर बसून निवडून आलेले आहेत. निवडणुकीत मला आणि सत्तारांना खिशात ठेवण्याची भाषा देखील दानवे यांनी केली आहे. दानवेंचे खिसे आता मोठे झाले आहेत, ते किती मोठे आहेत हे त्यांच्या जावयाला विचारा, असा टोला देखील खोतकर यांनी दानवेंना लगावला. नगर परिषदेची निवडणूक जवळ आहे, घोडा, मैदान समोर आहे तेव्हा कोण कोणाला खिशात घालते ते दिसेलच, असा इशारा देखील खोतकर यांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT