Local Body Result News : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत युती-आघाडीतील पक्षांनी वाढत्या इच्छुकांमुळे होणारी बंडखोरी रोखण्यासाठी अनेकांना स्वीकृत सदस्य करण्याचा शब्द दिला होता. तेव्हा शांत बसलेले बंडोबा आता स्वीकृतसाठी फिल्डींग लावतांना दिसत आहे. आता नेमकी लाॅटरी कोणाला लागणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
उदगीर नगरपालिकेमध्ये एकीकडे उपनगराध्यक्ष व सभापतिपदांसाठी रस्सीखेच सुरू असताना दुसरीकडे स्वीकृत नगरसेवकपदांसाठी जोरदार राजकीय डावपेच आखले जात आहेत. 8 किंवा 10 नगरसेवकांमागे 1 स्वीकृत नगरसेवक अशा सूत्रानुसार सर्व नगरपालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकपदाची संधी मिळण्याची शक्यता असून, इच्छुकांची संख्या मात्र त्यापेक्षा अधिक आहे.
उदगीर नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युतीने सत्ता काबीज केली असली, तरी स्वीकृत नगरसेवक निवडीत मित्रपक्ष आणि विरोधकांचीही गणिते महत्त्वाची ठरणार आहेत. निवडणूक काळात बंडखोरी रोखण्यासाठी काही इच्छुकांना स्वीकृत नगरसेवकपदाची ऑफर देण्यात आली होती. तसेच काही उमेदवारांचा अतिशय कमी फरकाने पराभव झाल्याने, त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठीही स्वीकृत नगरसेवकपदाचा पर्याय पुढे आला आहे. त्यामुळे सध्या दावे-प्रतिदावे वाढले आहेत.
स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असून, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी, आमदार व प्रमुख पदाधिकारी घेणार आहेत. कोणाचे पुनर्वसन होते, कोणाला संधी मिळते, कुणाची निराशा होते? हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
उदगीर नगरपालिकेत पाच स्वीकृत नगरसेवक निवडले जाण्याची शक्यता आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडे 20 तर भाजपकडे 13 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपला एक स्वीकृत सदस्याची संधी आहे. भाजपला (BJP) जर इतरांची मदत मिळाली तर अजून एक संधी मिळू शकते. काँग्रेस व एमआयएमकडे पुरेशे संख्याबळ नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला अधिक संधी आहे. यात कोणाची वर्णी लागते, याची उत्सुकता आहे.
उदगीर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्याकडे 33 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळे 2:1 स्वीकृत नगरसेवक जवळपास निश्चित मानले जात आहेत. एमआयएमचे पालिकेत दोन नगरसेवक आहेत. त्यांचा स्वीकृत नगरसेवक होऊ शकत नाही पण त्यांनी इतरांना पाठिंबा दिल्यास त्याचा इतरांना फायदा होऊ शकतो. भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला काही नगरसेवकांचे पाठबळ लागणार आहे. काँग्रेसला एका, भाजपला दुसऱ्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला तिसऱ्या स्वीकृत नगरसेवकासाठी एमआयएमच्या नगरसेवकांचे समर्थन आवश्यक ठरणार आहे. या गणितात राष्ट्रवादी की काँग्रेस? कोणाला मदत करायची याचा निर्णय एमआयएमवर अवलंबून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.