Prakash Solanke Sarkarnama
मराठवाडा

Prakash Solanke : राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंकेंची खदखद; ‘माझ्या मंत्रिपदाला माझी जात आडवी येते’

Cabinet Minister Post : मंत्रिमंडळ बनविण्याच्या वेळी माझ नाव चर्चेत येतं. पण मला ते मिळत नाही. कारण माझी जात आडवी येते, असं मला वाटतंय. जेव्हा जेव्हा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न येतो, तेव्हा नेहमीच नेतृत्वाने ओबीसी किंवा मागासवर्गीयांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मला मंत्री होईल वैगेरे अशा फार अपेक्षा नाहीत.

Vijaykumar Dudhale

Beed, 27 July : माजी मंत्री धनंजय मुंडे यांची राज्य मंत्रिमंडळात पुन्हा एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, त्यामुळे पक्षात पुन्हा नाराजीनाट्य पहायला मिळत आहे. माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांनी ‘आपल्या मंत्रिपदाच्या आड माझी जात येते. मी ओबीसी समाजात जन्माला आलो असतो, तर कदाचित मला खूप मोठी संधी मिळाली असती,’ असे म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत नुकतेच भाष्य केले होते. मात्र, मुंडे यांच्या मंत्रिपदाला विरोध होत असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्याच बीड जिल्ह्यातील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपल्याला मंत्रिपद मिळत नसल्याची खंत उघडपणे व्यक्त केली आहे.

प्रकाश सोळंके (Prakash Solanke) म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत संकेत दिले जात आहेत, हे आम्ही माध्यमांमधून पाहत आहोत. धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळणार असेल, त्यांना बीडचे पालकमंत्रिपद मिळणार असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छाच आहेत. ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, ज्येष्ठ आमदार म्हणून मुंडे यांना माझे आशीर्वाद असतील.

मंत्रिमंडळ बनविण्याच्या वेळी माझ नाव चर्चेत येतं. पण मला ते मिळत नाही. कारण माझी जात आडवी येते, असं मला वाटतंय. जेव्हा जेव्हा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न येतो, तेव्हा नेहमीच नेतृत्वाने ओबीसी किंवा मागासवर्गीयांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मला मंत्री होईल वैगेरे अशा फार अपेक्षा नाहीत. पक्षश्रेष्ठी त्याबाबत घ्यायचा तेव्हा निर्णय घेतील, असेही प्रकाशदादांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, मंत्रिपदाबाबतची आमची खंत आम्ही ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बोलून दाखवलेली आहे. पक्षनेतृत्वाकडे न्याय मिळाला पाहिजे, अशी बाजू आम्ही मांडलेली आहे. मांडलीच नाही, असं कसं होईल. पण जेव्हा संधी देण्याची वेळ येते, तेव्हा ते मागासवर्गीयांना संधी देतात, असा माझा अनुभव आहे.

धनंजय मुंडे हे न्यायालयीन चौकशीत निर्दोष निघाले, तर त्यांचे मंत्रिपद निश्चित आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका आमदाराला मंत्रिपद मिळतंय, याचा मला जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार म्हणून आनंद आहेच. महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, अशा माझ्या धनंजय मुंडे यांना शुभेच्छा आहेत, असेही सोळंके यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT