Kundalik Khande Beed Sarkarnama
मराठवाडा

शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच माझे नाव गुटखा प्रकरणात गोवले

(Kundlik Khande Sasi,our name in the Gutkha case only to discredit Shiv Sena)सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मात्र पक्षाला बदनाम करण्यासाठी कोणाची सुपारी घेतली? असा सावलही खांडे यांनी केला.

Dattatrya Deshmukh

बीड : आपण सामान्य कुटूंबातून आलो, घरात कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना आपण नऊ निवडणुका लढलो व सात जिंकलो. पक्षासाठी आपण करत असलेले काम प्रस्थापितांच्या डोळ्यात खुपत होते. त्यामळे मला कुठल्यातरी प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न सुरु होता, शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच आपले नाव गुटखा प्रकरणात गोवल्याचा आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केला.

पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षकांसह इतर पोलिस अधिकाऱ्यांचे काम उत्तम असून सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मात्र पक्षाला बदनाम करण्यासाठी कोणाची सुपारी घेतली? असा सावलही खांडे यांनी केला. गुरुवारी (ता. २५) पत्रकार परिषदेत त्यांचा अंगुलीनिर्देश पुर्णपणे त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांकडे दिसत होता.

१६ नाव्हेंबरला केजचे सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी नांदूरघाट (ता. केज) येथे दोन ठिकाणी छापे टाकून गुटखा पकडला. त्यानंतर बीडजवळील गोदामांवरही छापे टाकले. यावरुन केज पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद होऊन एका गुन्ह्यात तत्कालिन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे नाव आरोपींच्या यादीत आले.

त्यानंतर पक्षाने त्यांच्या जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती दिली असून बुधवारी (ता. २४) खांडे यांना अंबाजोगाईच्या सत्र न्यायलायाने कायमस्वरुपी अटकपूर्व जामिन मंजूर केला. त्यानंतर त्यांनी बीड, गेवराई व आष्टी - पाटोदा - शिरुर कासार मतदार संघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना सोबत घेत भूमिका मांडली.

पोलिस कारवाईवेळी महिलांना दमदाटी करत असल्याने आपण हस्तक्षेप केला. त्यातून गुन्ह्यात नाव नोंदले गेले. आपल्या विरुद्ध सुरुवातीपासून षडयंत्र रचले जात आहे, पक्षाकडे वारंवार तक्रारी केल्या जात आहेत.

मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याने पक्षाची बदनामी करण्यासाठीच आपल्यावर गुटखा प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला. आपल्याला सर्व पदाधिकाऱ्यांचा पाठींबा असून सर्वांच्या स्वाक्षरीचे पत्र मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्याचेही कुंडलिक खांडे म्हणाले. आपण कडवट शिवसैनिक असून यापुढेही शिवसेना सोडून काम करणार नाही, पक्ष घेईल तो निर्णय आपण मान्य करणार असल्याचेही कुंडलिक खांडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT