Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Nanded BJP Saree Distribution : अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत साडीवाटपावरून गोंधळ; दानवेंनी निवडणूक आयोगाला घेरले

Nanded BJP Saree Distribution Row: Ambadas Danve Questions Election Commission : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत अंगणवाडी सेविका सन्मान मेळावा; साड्यांचा साठा अपुरा पडल्याने महिलांची गर्दी, आचारसंहितेच्या काळातील वाटपावर दानवेंनी उपस्थित केले प्रश्न.

Pradeep Pendhare

Nanded News : माजी मुख्यमंत्री अशोच चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्यावतीने अंगणवाडी सेविकांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात साडी वाटपावरून मोठा गोंधळ उडाला. सभागृहात उपस्थित महिलांच्या तुलनेत साड्यांचा साठा अपुरा पडल्या. त्यामुळे महिलांनी साड्या मिळवण्यासाठी एकच गर्दी केली.

यावेळी काही महिलांनी एकमेकींच्या हातातून अक्षरशः साड्या हिसकावून घेण्याचा प्रकार केला. यामुळे सभागृहात झटापट आणि प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परंतु या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी थेट निवडणूक आयोगावर हल्लाबोल चढवला आहे.

नांदेड पदवीधर निवडणुकीसाठीची आचारसंहिता सध्या सुरू आहे. त्यात भाजप (BJP) सत्ताधाऱ्यांचा हा नांदेडमधील साडी वाटपाचा कार्यक्रमामागे राजकीय हेतू! कारणही राजकीय! कार्यक्रमस्थळी गोंधळ झाला तो वेगळाच! मात्र यामिनित्त निवडणूक आयोगाला काही प्रश्न आहेत, असे म्हणत अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

आचारसंहिता धाब्यावर बसवून जे हे साडीवाटप सुरू आहे, त्या नियमाची 'सूट' फक्त सत्ताधाऱ्यांनाच बहाल केली आहे की काय? याचा खर्च उमेदवाराच्या खर्चात लावण्यात आला आहे का? हे असले साडी वाटप निवडणुकीतील 'प्रलोभन' नाही ठरत काय? असे प्रश्न अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केले आहेत.

भाजपने आयोजित केलेला कार्यक्रम

नांदेड शहर भाजपचे महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर यांच्यावतीने 'सेवा संकल्प अभियाना' अंतर्गत अंगणवाडी सेविका सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आला होता. अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सत्कार करून त्यांना साडी भेट देण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी शहरातील शेकडो अंगणवाडी सेविका सभागृहात दाखल झाल्या होत्या.

साडी मिळवण्यासाठी महिलांची रेटारेटी

कार्यक्रमस्थळी एका बाजूने साडी वाटप सुरू होताच, एकच धांदल उडाली आणि आयोजकांच्या हातातून परिस्थिती हाताबाहेर गेली. साड्यांचा साठा मर्यादित असल्याने महिलांनी एकाच वेळी काउंटर रेटारेटी सुरू केली. साडी मिळवण्यासाठी महिलांमध्ये जोरदार चढाओढ लागली; काही महिलांनी एकमेकींच्या हातातील साड्या ओढून घेतल्या, तर काहींमध्ये साडी हिसकावून घेण्यावरून बाचाबाची आणि झटापट झाली.

निवडणूक आयोग कारवाई करणार का?

याच कार्यक्रमावरून अंबादास दानवे यांनी आता निवडणूक आयोगाला सोशल मीडियाद्वारे प्रश्न केले आहेत. प्रश्न उपस्थित करताना, अंबादास दानवे यांनी अशोक चव्हाण यांचे कमेंट देखील टॅग केली आहे. आचारसंहितेच्या काळात या साडी वाटपावर अंबादास दानवे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोग यावर कारवाई करणार का? असा प्रश्न आता चर्चेत आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT