Nanded BJP Sarkarnama
मराठवाडा

Nanded BJP: माजी आमदारानंतर आता माजी मंत्र्यांची भाजपला सोडचिठ्ठी; दोन्ही नेते शरद पवार गटात जाणार?

सरकारनामा ब्यूरो

Nanded News:माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनी भाजपाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नुकताच प्रवेश केला. त्यानंतर आता नांदेडमध्ये भाजपाला दुसरा धक्का बसला आहे. माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांची भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

भाजपाचे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव (Sudhakar Bhalerao) यांनी भाजपला राम राम ठोकला आहे, त्यानंतर नांदेडमध्ये माधवराव किन्हाळकर यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. किन्हाळकर शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे.

माधवराव पाटील किन्हाळकर यांनी दहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण किन्हाळकर यांना मागील 10 वर्षात भाजपाने कुठलीही जवाबदारी दिली नाही. त्यामुळे ते भाजपमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांच्यानंतर त्यांनी देखील भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला होता. आज किन्हाळकर यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे माधवराव पाटील किन्हाळकर यांनी (BJP) भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार पडले आहे.

काल (सोमवारी) भाजपाचे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव (Sudhakar Bhalerao) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती साम टीव्हीने दिली आहे. त्यानंतर भाजपमधील दुसरा मोठ्या नेत्यानं भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जाता आहे.

किन्हाळकर हे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये 1991 ते 1995 या कालावधीत ते गृह व्यवहार, महसूल आणि सहकार राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांनी 2014 मध्ये भोकर (विधानसभा मतदारसंघ) मधून अमिता अशोकराव चव्हाण यांच्या विरुद्ध भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.ते या निवडणुकीत पराभूत झाले होते.

छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे माजी महापौर राजू शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गळाला भाजपचा बडा मासा लागला आहे. भाजपाचे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव (Sudhakar Bhalerao) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती साम टीव्हीने दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT