Nanded News Sarkarnama
मराठवाडा

Nanded Collector Office : 'किडनी विकणे आहे'; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर झळकले पोस्टर, नेमका काय प्रकार?

Mangesh Mahale

Nanded News : सावकारी कर्ज फेडण्यासाठी "किडनी विकणे आहे" अशा आशयाचे फलक नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर झळकले आहेत. चक्क किडनी विकण्याची जाहिरात आणि त्यावर मोबाईल क्रमांकदेखील असल्याने या पोस्टरबाबत चर्चा सुरू झाली आहे. सत्यभामा चुनचूनवाड या महिलेने हे पोस्टर लावले आहे. सावकारी कर्ज फेडण्यासाठी आपण किडनी विकण्याचे पोस्टर लावल्याचे त्यांनी सांगितले.

सत्यभामा चुनचूनवाड या नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील वाई या गावात राहतात. लॉकडाऊनपूर्वी त्यांनी दोन लाख रुपये सावकाराकडून व्याजाने घेतले, पण नंतर त्यांना परतफेड करता आली नाही. सावकाराच्या भीतीने त्यांनी कुटुंबासह गाव सोडलं. सध्या त्या मुंबईत असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन वर्षांपासून त्यांच्या गावाकडील घराला कुलूप आहे. दोन वर्षांपासून त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा गावातील कोणाशीही संपर्क झाला नाही. परंतु किडनी विकणे लावलेल्या पोस्टरने मात्र नांदेड खळबळ उडाली आहे.

सध्या त्या मुंबईतील धुणी-भांडी करून उपजीविका करीत आहेत. पण गावाकडे जाऊन फूलशेती करण्याचा त्यांचा विचार आहे, पण सावकाराला पैसे द्यायचे असल्याचे त्यांनी ही जाहिरात लावली आहे. त्यांना पाच मुले आहेत. ज्याची किडनी कुणाला फिट बसत असेल त्याला ती विकायची आहे, असे त्या महिलेने साम टीव्हीला सांगितले.

दरम्यान, परभणीतील पूर्णा तालुक्यात धनगर टाकळी येथील सततच्या नापिकी व कर्जाला कंटाळून झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील गंगाधर धारोजी कोकरे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT