NCP MLA Pratap Patil Chikhlikar faces a setback after his nomination for the Nanded District Central Cooperative Bank election was rejected under the new cooperative law. Sarkarnama
मराठवाडा

Nanded DCC Bank : राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर अपात्र; एका नियमामुळे DCC बँक निवडणुकीचा अर्ज बाद

Nanded DCC Bank : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद झाला.

Jagdish Pansare

Nanded politics : नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर बाहेर पडले आहेत. नव्या सहकार कायद्यानुसार चिखलीकर यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. या नव्या कायद्यानुसार, बँकेच्या आठ माजी संचालकांना दहा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे संचालक मंडळाची निवडणूक लढवता येणार नाही.

नांदेड जिल्हा बँकेच्या 23 जागांसाठी छाननीत 169 अर्ज वैध ठरले आहेत.नायगावचे भाजपा आमदार राजेश पवार यांच्यासह काही प्रस्थापितांनी इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मतदार संघातून अर्ज भरले आहेत. त्याचवेळी चिखलीकर, माजी संचालक गोविंद नागोलीकर यांच्यासह अनेकांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत.

नांदेड जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सहकार कायद्याच्या नव्या नियमानुसार तत्कालीन संचालक मंडळातील आठ जणांचा पत्ता कट होणार हे स्पष्ट झाले होते. यामध्ये जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा प्रामुख्याने समावेश होता.

यानंतरही चिखलीकर यांनी लोहा तालुका विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून तर नागोलीकर यांनी मुदखेडच्या सोसायटीतून अर्ज दाखल केला होता. हे अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. अशोक चव्हाण यांचे समर्थक बालाजी पांडागळे यांचाही कंधार तालुका सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील अर्जही बाद झाला आहे.

देवरे -धोंडगे यांचे अर्ज वैध

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून 16 जागा आहेत. त्यासाठी 79 उमेदवारांनी अर्ज दाखल केली होती तर इतर सात जागांसाठी 90 जणांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. कंधार तालुक्यात प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता देवरे आणि माजी आमदार शंकर धोंडगे यांचे बंधू सुनील धोंडगे हे मैदानात आहेत.

तिकडे भाजपचे आमदार राजेश पवार यांनी मागासवर्ग प्रतिनिधी मतदारसंघातून अर्ज भरला आहे. त्यांचे विरोधात त्यांच्या चुलत बहीण बहीण मंगलबाई रामराव पाटील यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्या सूचनेवरून अर्ज भरल्याचे बोलले जाते. वेगवेगळ्या गटांमध्ये तडजोड झाले असल्या तरी रातोळीकर यांनी बहिण भावातील लढत होऊ द्यावी, अशी भूमिका घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सेवा सहकारी संस्था मतदारसंघ उमरी तालुक्यातून मारोतराव कवळे यांनी तर धर्माबाद तालुक्यातून त्यांच्या पत्नी सागराबाई कवळे यांनी अर्ज भरला आहे. तडजोडीत उमरी आणि धर्माबादची जागा मित्र पक्षांसाठी सोडू नका, असे कवळे यांनी अशोक चव्हाण यांना आधीच सांगितले होते. त्यानुसार पुढील योजना आखण्यात आली आहे.

माजी संचालक हनुमंतराव पाटील यांच्या पत्नी सुशीलाबाई यांनी मुखेड तालुक्यातून दाखल केलेला अर्ज वैध ठरला आहे. बेटमोगरेकरांचे बंधू माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी बिगर शेती सहकारी संस्था व व्यक्ती सभासद मतदारसंघातून अर्ज भरला आहे. या मतदारसंघात एका जागेसाठी सतरा उमेदवार रिंगणात आहेत.

बँकेच्या माजी संचालकांपैकी बी. आर. कदम, कैलास देशमुख गोरठेकर, विजयसिंह देशमुख, भगवानराव पाटील आलेगावकर, राजेश देशमुख कुंटूरकर, लक्ष्मण ठक्करवाड, राजेंद्र केशवे, गंगाधर राठोड, शिवराम लुटे, दिलीप कुंदरकुर्ते, सुशांत चव्हाण, खासदार रवींद्र चव्हाण, शिवकुमार भोसीकर आणि व्यंकटराव जाळणे हे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

महिलांसाठी राखीव असलेल्या दोन जागांसाठी 23 अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये राजकीय नेत्यांच्या सहभाग्यवतींची संख्या लक्षणीय आहे. यात प्रामुख्याने पुनम राजेश पवार, सुशिलाबाई हनुमंतराव पाटील, मंगलबाई रातोळीकर सागरबाई कवळे संगीता पावडे जाई देशमुख गोरठेकर, अर्चना दहिफळे आणि विशाखा मुकेश पाटील यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT