Nanded News : एकीकडे मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकच्या एन्ट्री गेटलाच दरड कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यानंतर रस्त्यावर पडलेला राडारोडा दूर करत तब्बल 18 तासांनंतर पुन्हा वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्यात आली. मात्र, तोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण सत्ताधारी-विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांनी तापल्याचं दिसून आलं. हे प्रकरण ताजं असतानाच नांदेडमधील एका धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.
नांदेडमधील विष्णुपुरी परिसरात नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा एक भाग गुरुवारी(ता.9) पहाटे अचानकपणे पत्त्यासारखा थेट खाली असणाऱ्या रस्त्यावर कोसळला.धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या वर्षभरापूर्वीच हा उड्डाणपूल बांधून पूर्ण झाला होता.
एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयाजवळ असणाऱ्या विष्णुपुरी उड्डाणपुलाचा काही भाग वर्षभरातच ढासळलेल्या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र,या घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून उड्डाणपुलाच्या गुणवत्ता आणि बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मात्र, संबंधित कंत्राटदारानं नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळण्यापाठीमागं कारण हे पहाटेच्या सुमारास मराठवाड्यात 3.06 ते 4.06 तीव्रतेचे जे भूकंपाचे धक्के असल्याचं म्हटलं आहे.
नांदेडसह मराठवाड्यात गुरुवारी पहाटे बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळेच हा उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्याचा दावा कंत्राटदारानं केला आहे. या परिसरात महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालय असल्याने नेहमी मोठी वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणचा उड्डाणपूल कोसळल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.