Ashok Chavan  Sarkarnama
मराठवाडा

Nanded BJP News : चिखलीकरांच्या विजयाची अशोक चव्हाणांना गॅरंटी...

Ashok Chavan Loksabha Election News : आता जुनं सगळं विसरा असं म्हणत अशोक चव्हाण यांनी भाजपमधील निष्ठावंतांना मी तुमचाच आहे, अशी ग्वाही देत नांदेडमधील मोठ्या विजयासाठी कामाला लागा, असे आवाहन केले.

Jagdish Pansare

Nanded Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेस महाआघाडीचे वसंत चव्हाण यांच्यात थेट लढत होणार आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर ते चिखलीकर यांच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील का?

त्यांच्यातील सुप्त संघर्ष मिटला का? अशा चर्चांना उधाण आले होते. परंतु आता जुनं सगळं विसरा, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी भाजपमधील निष्ठावंतांना मी तुमचाच आहे, अशी ग्वाही देत नांदेडमधील मोठ्या विजयासाठी कामाला लागा, असे आवाहन केले. (Latest News on Nanded Politics in Marathi)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांच्या नांदेडमधील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी चिखलीकर यांच्या विजयाची गॅरंटीच घेतली.

नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर यांचा विजय निश्चित आहे. त्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे मेहनत घ्यायची आहे, असे आवाहन चव्हाण यांनी केले. लोकसभा निवडणुकीची चर्चा जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून नांदेडची जागा डेंजर झोनमध्ये आहे असे बोलले जात होते.

भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये चिखलीकर यांच्या विरोधात वातावरण असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. दरम्यान, अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा भाजपमध्ये (BJP) प्रवेश झाला आणि आता चिखलीकरांना उमेदवारी मिळते की नाही? अशा शंकाही उपस्थित केल्या गेल्या. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या कित्येक वर्षांपासून चव्हाण आणि चिखलीकर यांच्यात राजकीय वैर असल्याचे स्पष्ट आहे.

राज्यसभेवर खासदारकी मिळाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी एका कार्यक्रमात आपण आता भाजपमध्ये हळूहळू सेट होत आहोत, शिकत आहोत असे म्हटले होते. त्याला भाजपचे खासदार डॉ. अजित गोपछडे (Ajit Gopchade) यांनी भाजप भल्याभल्यांना कळली नाही, अशोकराव तुम्ही या पक्षात अजगराएवढे मोठे व्हाल, असे विधान करत सूचक इशारा दिला होता.

त्यामुळे अशोक चव्हाण यांना राज्यातील आणि दिल्लीतील नेत्यांनी स्वीकारले असले तरी भाजपच्या निष्ठावंतांनी स्वीकारले नाही, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. याची जाणीव स्वतः अशोक चव्हाण यांनाही होती. त्यामुळेच त्यांनी एका पक्षप्रवेश सोहळ्यात आता जुनं सगळं विसरा, मी मोदीजींचे विचार स्वीकारले आहेत, आता मी तुमचाच आहे, असे म्हणत साद घातली होती.

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधील समर्थकांना भाजपमध्ये आणून जिल्ह्यात पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. शिवाय आता प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराची सूत्रंही त्यांनी हाती घेतल्याचे दिसून येत आहे.

काल झालेल्या भाजप लोकसभा प्रचार (Lok Sabha campaign) कार्यालयाच्या उद्घाटनात अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मोठ्या विजयाची शाश्वती दिली. जणू आपण त्यांच्या विजयाची गॅरंटीच घेतल्याचे चव्हाण यांनी दाखवून दिले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT