Nanded Market Committee News
Nanded Market Committee News Sarkarnama
मराठवाडा

Nanded Market Committee : काॅंग्रेसची एकाधिकारशाही मोडीत काढा, चिखलीकरांनी प्रचाराचा नारळ फोडला..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Nanded Market Committee) गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची एकाधिकारशाही आहे. ती मोडून काढण्याची संधी आहे, आता यांना धडा शिकवा आणि युतीच्या परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडून द्या, असे आवाहन करत भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

मरळक (ता. नांदेड) येथील प्रचारसभेत सभेत चिखलीकर यांनी (Ashok Chavan) अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. (Nanded) नांदेड बाजार समितीच्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर महाविकास आघाडी व भाजप-शिंदे युतीने भर दिला आहे. युतीच्या प्रचाराची पहिली सभा मरळक येथील महादेव मंदिर परिसरात घेण्यात आली.

या प्रचार सभेला खासदार चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांच्यासह खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, ज्येष्ठ नेते धर्मराज देशमुख आदी प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. चिखलीकर म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने नांदेड जिल्ह्यात अभुतपूर्व अशी विकासाची कामे सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी सुमारे साडेसहा हजार कोटींचा निधी मंजूर झाला असून कामे सुरु आहेत.

नांदेड बाजार समितीसह जिल्ह्यात अनेक वर्षांपासून एकाधिकारशाही सुरू आहे. सामान्य मतदारांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत जसे परिवर्तन घडवून आणले त्याचप्रमाणे बाजार समितीत परिवर्तन करा, असे आवाहन चिखलीकरांनी केली. खासदार हेमंत पाटील व आमदार कल्याणकर यांच्यासह इतरांनी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT