Ashok Chavan-Chikhlikar-MP Ravindra Chavan-Balaji Kalyankar News Nanded Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation News : 'आपण यांना पाहीलंत का?' बॅनर झळकावत नांदेडमध्ये खासदार, आमदारांविरोधात मराठा समाज आक्रमक!

Maratha protestors in Nanded express anger against local MLAs and MPs for not supporting the movement. : मराठा आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी हजेरी लावा, अन्यथा तुमचा मराठा आरक्षणाला विरोध आहे, असे समाज समजेल.

Jagdish Pansare

Nanded News : ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील लाखो मराठा बांधव 27 ऑगस्ट पासून मुंबईच्या दिशेने निघाले होते. दरम्यान जे कोणी आंदोलनाला पाठिंबा देणार नाहीत, त्यांना निवडणुकीत पाहून घेऊ, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला निघण्याआधी दिला होता.

29 ऑगस्ट पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार, खासदार जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर गेले होते. (Maratha Reservation) परंतु विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मराठवाड्यातील ज्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळावा म्हणून अंतरवाली सराटी गाठली होती ते आता कुठे दिसेनासे झाले आहेत.

नांदेड (Nanded) जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी सर्वपक्षीय आमदार, खासदारांना याचा जाब विचारत बॅनरबाजी केली आहे. शहरातील महात्मा फुले चौकात 'आपण यांना पाहिलंत का'? अशा आशयाचे बॅनर झळकावत मराठा बांधवांनी संताप व्यक्त केला आहे. या बॅनरवर भाजपचे खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, विधान परिषदेतील शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर, भाजपचे राजेश पवार, बाबुराव कदम आणि आनंद बोंढारकर यांचे फोटो लावण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणुकीआधी मनोज जरांगे पाटील यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जिल्ह्यातील सगळे लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे चकरा मारत होते. परंतु आज गरजवंतांचा लढा जरांगे पाटील मुंबईत लढत असताना त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी पुढे आला नाही. मुंबईत आझाद मैदानावर जाऊन मराठा आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी हजेरी लावा, अन्यथा तुमचा मराठा आरक्षणाला विरोध आहे, असे समाज समजेल. आणि येणाऱ्या काळात याबद्दल समाज तुम्हाला निश्चितच धडा शिकवेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT