Nanded Municipal Council : नुकत्याच झालेल्या नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणूक लढवलेल्या आणि विजयी झालेल्या काँग्रेस नगरसेविका आफिया नाज अब्दुल रशीद यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नगरसेविकेसह तिचा पती व इतरांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड- वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मधून इतर मागास ओबीसी प्रवर्गातून काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका अफिया नाज अब्दुल रशीद ह्या निवडून आल्या होत्या. त्यांचे पती आरोपी काजी नाफे यांच्या संगनमताने कोणतेही नातेसंबंध नसलेल्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मोहम्मद जकारिया अब्दुल रशीद हा आपला सख्खा भाऊ असल्याचे दाखवले होते.
एवढेच नाही तर त्याच्या नावाने बनावट शपथ पत्र तयार करून त्याच्या स्वाक्षरीने बनावट वंशावळ तयार केली होती. याच आधारे नगरसेविका अफिया नाजी यांनी इतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळवले.
ही बाब वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मोहम्मद जकारियाचे वडील अब्दुल रशीद यांना समाज माध्यमातून कळाली. त्यांनी या घटनेची तातडीने दखल घेत इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.
पोलिसांनी तात्काळ आरोपी नगरसेविका अफियानाज अब्दुल रशीद व तिचे पती काजी नाफे व अन्य काही जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस इतवारा पोलीस करत असून काँग्रेस नगरसेविकेवर सदस्य पद गमावण्याची वेळ आली आहे.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाने स्वबळावर सत्ता स्थापन केली. भाजपाला 45 जागा मिळाल्यामुळे बहुमतासह या पक्षाने महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती ही महत्वाची पद आपल्याकडे घेतली आहे.
काँग्रेस पक्षाचे या महापालिकेत दहा नगरसेवक निवडून आले आहेत. 10 जागा शिवसेना शिंदे गट, एमआयएम 14, राष्ट्रवादी अजित पवार गट, 2 वंचित आघाडी 5 असे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.