Mp Navneet Rana-Subhash Wankhede News Nanded Sarkarnama
मराठवाडा

Nanded : नवनीत राणा या मोदी आणि भाजपच्या अंधभक्त..

फक्त २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या नेत्यांची आपल्यावर कृपादृष्टी असावी या हेतूनचे राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ( Ex. Mp. Subhash Wankhede)

सरकारनामा ब्युरो

नांदेड : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषा वापरत टीका केल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. माजी खासदार आणि नुकतेच (Shivsena)शिवसेनेत परतलेले सुभाष वानखेडे यांनी देखील नवनीत राणा यांचा समाचार घेतला. केवळ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप व मोदी, शहांचे आपलल्याकडे लक्ष असावे या एकमेव हेतून राणा या उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत.

भाजप आणि मोदींच्या त्या अंधभक्त आहेत हे यावरून सिद्ध झाल्याचा टोला देखील वानखेडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना लगावला. (Nanded) नवीनत राणा यांनी हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात अतिउत्साहात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ` तू शिवसेनावाला है, तू उद्धव ठाकरे है तो मै भी राणा हू`, अशी भाषा वापरत राणा यांनी ठाकरे यांना आमने-सामने येण्याचे आव्हान दिले होते.

त्यानंतर राज्यभरातून शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागल्या होत्या. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील नवनीत राणा यांचा `सिगारेट पिणारी बाई`, असा करत त्यांना सुनावले होते. त्यानंतर आता माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी देखील नवनीत राणा यांच्यावर टीका करतांना त्यांना अंधभक्त म्हणून टोला लगावला आहे.

वानखेडे म्हणाले, आदरणीय नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून अपक्ष निवडून आल्या. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या आशिर्वादाने त्यांना विजय मिळाला होता. उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषा वापरून टीका करण्याती त्यांची लायकी नाही. त्या राजकारणात येण्याआधी काय होत्या हे सगळा महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे मी त्यावर अधिक काही बोलणार नाही.

फक्त २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या नेत्यांची आपल्यावर कृपादृष्टी असावी या हेतूनचे राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या आपल्याकडे लक्ष असावे, याच भावनेतून ही टीका केली गेली. यावर अधिक भाष्य करण्याची व नवनीत राणा यांना महत्व देण्याची गरज नाही, असेही वानखेडे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT