Ajit Pawar Reaction On Sambhajinagar News Sarkarnama
मराठवाडा

Ncp : औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न अजित पवारांनी खुबीने टोलवला..

Ajit Pawar : आरे ला कारे करण्यापेक्षा मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न केले तर निश्चितच यशस्वी होवू.

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : जिल्ह्याच्या राजकारणात औरंगाबादचे नामांतर संभाजीगर करण्याचा मुद्दा नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. विशेषतः महापालिका निवडणुकीत हा मुद्दा कायम कळीचा ठरत आला आहे. यापुर्वी (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडी सरकारने या शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा ठराव विधानसभेत संमत केला होता.

त्यानंतर सत्तांतर होवून शिंदे-फडणवीस सरकार आले, त्यांनी नव्याने ठराव करून छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजुर करून घेतला. (Ajit Pawar) आता तो केंद्राकडे अंतिम निर्णयासाठी पाठवण्यात आल्याचे सांगितले जाते. (Ncp) सध्या राज्याच्या राजकारणात महापुरूषांच्या नावावरून किंवा त्यांचा चुकीचा उल्लेख केल्यामुळे वातावरण तापलेले आहे.

नुकत्याच झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी नव्या वादाला तोंड फोडले. ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाही, तर स्वराज्यरक्षक होते, असे विधान अजित पवारांनी केला हा वाद सध्या चांगलाच गाजतोय. त्यात औरंगाबाद दौऱ्यावर त्यांना शहराच्या नामांतरावर पत्रकारांनी प्रश्न केला, तेव्हा अगदी सावध भूमिका घेत त्यांनी मोठ्या खुबीने तो टोलवला.

अजित पवार म्हणाले, एकमेकांची उणीदुणी, इतिहासातील महापुरूषांच्या उपाधीवरून दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप यातच आपण वेळ घालवत आहोत. इतिहासामध्ये ज्यांचा अभ्यास आहे, त्यांनीच त्यावर बोलावे, ज्यांना त्याच्यातले जास्त कळत नाही, त्यांनी नाक खुपसू नये. आपण औरंगाबाद, संभाजीनगर, धर्मवीर, स्वराज्यरक्षक यातच अडकून पडलो आहोत.

आरे ला कारे करण्यापेक्षा मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न केले तर निश्चितच यशस्वी होवू. राज्यात सध्या जे चाललय, ते फार काही समाधानकारक नाही. कित्येक वर्षांपासून आम्ही राजकारण करतोय, पण सध्याचे प्रकार चांगले नाहीत, वाचाळवीरांना हे लक्षात आणून दिले पाहिजे. आमच्या वतीने आम्ही हे काम करूच, इतर पक्षांनी देखील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही अजित पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT