Ncp Leader Ajit Pawar-Jayant Patil News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Ncp : अजित पवार म्हणाले स्वबळावर , तर जयंतरावांचे प्राधान्य आघाडीला..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकसंध राहावी, याला आमचे प्राधान्य असणार आहे. पण स्थानिक नेत्यांनी चर्चा करून आघाडीतील इतर पक्षांशी बोलून निर्णय घ्यावा. (Jayant Patil)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अधिवेशनात अजित पवारांना भाषण करू दिले नाही, म्हणून ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ` कसं काय पाटील, बर हायं का दिल्लीत जे घडलं ते खरं आहे का`, असा टोला पैठणच्या सभेत लगावला होता. यावर (Ncp) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्पष्टीकरणही दिले. पण पक्षात या दोन्ही नेत्यांची मत वेगळी असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

नुकतेच अजित पवार (Ajit Pawar) औरंगाबादला आले होते, तेव्हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी स्पष्टपणे महाविकास आघाडी करण्याची आमच्या स्थानिक नेत्यांची इच्छा नाही, त्यामुळे आम्ही स्वबळावरच लढणार, अशी भूमिका स्पष्ट केली होती.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र आपले प्राधान्य हे महाविकास आघाडी एकसंध ठेवण्याला असेल, असे सांगत अजित पवारांच्या विरुद्ध भूमिका घेतल्याचे दिसून आले. जयंत पाटील हे मराठवाडा दौऱ्यावर असून शहर व ग्रामीण भागातील संघटनात्मक आढावा बैठका ते घेत आहेत. राष्ट्रवादी भवनात बैठक पार पडल्यानंतर प्रसार माध्यमांनी पाटील यांनी आगमी निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार की स्वबळावर असा प्रश्न अजित पवारांच्या विधानाचा दाखला देत केला.

यावर जयंत पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकसंध राहावी, याला आमचे प्राधान्य असणार आहे. पण स्थानिक नेत्यांनी चर्चा करून आघाडीतील इतर पक्षांशी बोलून निर्णय घ्यावा, अशी आमची भूमिका असल्याचे सांगत महाविकास आघाडीला आपले प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले.

त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भूमिकेत विसंगती दिसून आली. दिल्लीच्या अधिवेशनात अजित पवारांना भाषण करू दिले नाही, या आरोपावर देखील पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले. अजित पवार फ्रेश व्हायला गेल्यामुळे त्यांची भाषण करण्याची संधी हुकली, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT