Dhananjay Munde death threat Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde death threat : 'तुझे 18 तुकडे करणार, धनंजय मुंडेंची धमकी'; करुणा यांच्या गंभीर आरोपानं खळबळ

Dhananjay Munde Accused of Death Threat by Karuna Munde NCP Beed MLA in Controversy : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीडमधील आमदार धनंजय मुंडे यांनी धमकी दिल्याचा खळबळजनक आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे.

Pradeep Pendhare

NCP Beed MLA news : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

करुणा शर्मा-मुंडे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. धनंजय मुंडे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला असून, याबाबत कोर्टात पुराव्यासह लेखी तक्रार करणार असल्याचे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.

'तुझे 18 तुकडे करणार, अशी फोन द्वारे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी धमकी दिल्याचा करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केला. ही धमकी 12 दिवसांपूर्वी मला दिल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला. अजून मी मुंडे कुटुंबाबद्दल 50 टक्के पण तोंड उघडले नाही. उघडायला लाऊ नका, असा देखील इशारा करुणा मुंडे यांनी दिला आहे.

धमकी संदर्भात माझ्याकडे ऑडिओ क्लिप लवकरच न्यायालयात (Court) पुरावे सादर करणार आहे. मुंडे यांनी माझ्या केसाला धक्का लावून दाखवावे, असं आव्हान देखील करुणा मुंडे यांनी दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्या लोकांकडून धमकी दिली जात आहे, तुझे व्हिडिओ आमच्याकडे आहेत, आम्ही ते व्हायरल करू, असं धमकावलं जात आहे, असेही करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचा पोटगी प्रकरणावरील निकाल मुंबईतील वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने सहा फेब्रुवारी 2025 मध्ये दिला आहे. धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेंना देखभालीसाठी महिन्याला एकूण 2 लाख रुपये द्यावेत, असे या आदेशात म्हटले आहे. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात 'घरगुती हिंसाचार कायद्या'अंतर्गत 2022 मध्ये गुन्हा दाखल केला होता आणि मासिक पोटगीची मागणी केली होती. धनंजय मुंडेंच्या वकिलांनी हे आरोप फेटाळले आहेत.

वांद्रे न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत धनंजय मुंडे यांनी माझंगाव न्यायालयात धाव घेतली होती. परंतु तिथंही न्यायालयानं निकाल कायम ठेवला. हा धक्का असतानाच, याच काळात बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरण गाजले. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड यात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे. याच दरम्यान त्यांचे मंत्रीपद गेलं.

करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील कौटुंबिक वाद चांगलाच टोकाला पोचला आहे. दोन्ही न्यायालयाच्या निर्णयानंतर आता, करुणा मुंडे यांनी वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली आहे. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यासाठी न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. धनंजय मुंडे यांच्या गुंडाकडून मिळणाऱ्या धमक्याबाबतही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत साखर कारखाने किंवा इतर प्रॉपर्टी कुणी खरेदी करू नये, यासाठी याचिका दाखल केल्याचं करुणा मुंडे यांनी पुढे म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT