Bachchu Kadu 1 Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde On Bachchu Kadu : महाक्रूरदादाला राजाश्रय, मुंडेंच्या राजीनाम्यात 'प्रवृत्ती'; बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'

NCP Dhananjay Munde resignation Bachchu Kadu Mahayuti government political crimes Beed : एनसीपीचे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर बीडमधील राजकीय गुन्हेगारीवरून माजी मंत्री बच्चू कडू यांची महायुती सरकारवर जोरदार टीका.

Pradeep Pendhare

Beed Crime News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीडमधील नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारीवरून मुंडेंवर चौहू बाजूने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. महायुती सरकारच्या या दिरंगाईवर देखील विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

माजी मंत्री तथा प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी देखील टायमिंग साधले आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा देशमुख यांना श्रद्धांजली देऊन केला नाही, तर आजारपणाच कारण देत दिला. यातून त्यांची काय 'प्रवृत्ती' आहे, हे दिसते, असा टोला बच्चू कडू यांनी मुंडेंना लगावला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो अन् व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. यातूनच दबाव येताच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रि‍पदाची राजीनामा दिला. मुंडे यांनी राजीनामा देताना, आजारपणाचे कारण पुढे केल्याने महाराष्ट्रातील संतापाच्या लाटेत अधिकच भर पडली. यावरून माजी मंत्री बच्चू कडू यांनी टायमिंग साधत, धनंजय मुंडे अन् महायुती सरकारवर 'प्रहार' केला आहे.

बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले, "धनंजय मुंडे यांनी स्वतःचा राजीनामा, हा देशमुख यांना श्रद्धांजली देऊन केला नाही, तर आजारपणाच कारण देत दिला. यात देखील त्यांची काय 'प्रवृत्ती' आहे, हे समोर आलं. मुंडे यांनी यातून ते किती लहान आहे, हे लोकांना दाखवून दिले. तुम्ही मंत्री, आमदार आहात, मोठेपण घेता आलं पाहिजे". महायुती सरकारच्या दुटप्पीपणावर बोलताना, सरकार एकीकडे प्रभू श्रीरामाचे नाव घेते, अन् दुसरीकडे अशा प्रवृत्तीला खतपाणी घालत आहे, असा देखील बच्चू कडू यांनी आरोप केला.

सत्ता एवढच शिल्लक राहिलय

'धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन भागणार नाही, या प्रवृत्तीला खतपाणी कोणी घातलं? कशाप्रकारे या प्रवृत्ती देशात, राज्यात वाढत चालल्या आहे? पक्ष आणि कार्यकर्ता अन्, कार्यकर्त्याच्या माध्यमातून सत्ता एवढेच शिल्लक राहिलं आहे का?', असाही प्रश्न बच्चू कडू यांनी केला.

प्रवृत्तीने मारलं...

हातात तलवारी घ्या आणि कापा, बलात्कार करा, काही करा, पण सत्ता आमच्या हाती द्या. एवढाच विचार करणाऱ्या राज्यकर्त्यांचा आम्ही निषेध केला पाहिजे. मारणारा कोणत्या जातीचा होता आणि मरणारा कोणत्या जातीचा होता, हा विषय महत्त्वाचा नाही, ज्या प्रवृत्तीने मारलं, ज्यापद्धतीने त्यांना मारलं हे फार वाईट असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले.

गुन्हेगारीला राजाश्रय मिळाला

'वाल्मिक कराड सारख्या प्रवृत्तीला दहा, वीस वर्षात खतपाणी घातल्या गेलं.यातून महाक्रूरदादा या ठिकाणी निर्माण होतो आणि त्याला राजाश्रय मिळतो, हे फार वाईट आहे', याकडे बच्चू कडू यांनी लक्ष वेधले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT