बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्याचे चित्र अजित पवारांच्या बैठकीनंतरही कायम आहे.
पक्षातील स्थानिक नेते अजूनही एकत्र येण्यास तयार नसल्याने गटबाजीची ठिणगी कायम धगधगते आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही फूट राष्ट्रवादीच्या संधींवर परिणाम करू शकते.
दत्ता देशमुख
Marathwada Political News : स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या आखाड्याची तयारी सुरू असताना इकडे बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत कुरबुरी काही संपेना. एकमेकांची उणीदुणी, श्रेय लाटण्याची स्पर्धा आणि नेतृत्वावरून असलेला वाद यावर अजित पवारांच्या बैठकीनंतरही परिस्थिती फारशी बदललेली नाही. नगरपालिका, नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ जवळ आली असली तरी बीड राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांचे सूर काही जुळत नाहीये.
मागच्या दोन वर्षांपासून बीड शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील संदोपसंदी आता नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावरही कायमच आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी खुद्द पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतरही स्थानिक नेत्यांमध्ये 'एकसुर' होण्याचे नाव नाही. नगराध्यक्ष व नगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुढच्या तीन दिवसांनी सुरुवात होणार आहे.
मात्र, पक्षातील बीडच्या नेत्यांचे 'मी आणि माझ्यामुळे' हा वाद कायमच आहे. पक्षाकडून इच्छुकांचे उमेदवारी अर्जाबाबत शहराध्यक्ष अमर नाईकवाडे यांनी माध्यमांना प्रसिद्धीपत्रक पाठवताच काही वेळाने पुन्हा विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागरांमुळे इच्छुकांचे अर्ज वाढल्याचे प्रसिद्धीपत्रक आले. यापूर्वीही क्षीरसागर यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समर्थकांची बैठक घेतली आणि लागेच शहराध्यक्षांनी पक्षाच्या अधिकृत बैठकीची घोषणा केली.
या बैठकीतही एकमेकांबद्दल उणेदुणे काढण्याचाच प्रमुख कार्यक्रम झाला. विशेष म्हणजे सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीतही हाच अंक पुन्हा झाला. पण, त्यानंतर तयारी करुन नेते 'हातात हात' घालून मनानेही एकत्र येतील, ही अपेक्षा फेाल ठरली आहे.
नेमका वाद काय?
डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांची शहरात मोठी राजकीय ताकद असल्याने सर्वाधिक काळ ते नगराध्यक्ष राहीले व पालिकेवरही सलग 25 वर्षे सत्ता राखली. त्यापूर्वीही काही काळ त्यांचीच सत्ता होती. मात्र, त्यांच्या राजकीय निवृत्तीनंतर त्यांचा वारसा पुत्र डॉ. योगेश क्षीरसागर यांच्याकडे आहे. त्यांचेही शहरात मोठे संघटन आणि वडिलांपासून त्यांना माणणारा मोठा वर्ग आहे.
मात्र, पक्षातील काही माजी नगरसेवकांनी एक गट करुन पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांचे नेतृत्व नाकारले आहे. त्यांची उठबस माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याकडे आहे. पंडित यांना माणणाराही मोठा वर्ग बीडमध्ये आहे. मात्र, डॉ. क्षीरसागरांना पंडितांचा बीडमध्ये हस्तक्षेप नकोय, यावरुन हा पक्षांतर्गत वाद वाढलेला आहे.
2. अजित पवारांनी गटबाजी मिटवण्यासाठी काय प्रयत्न केले?
→ त्यांनी बैठक घेऊन सर्व नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, पण ते यशस्वी ठरले नाहीत.
3. या गटबाजीचा पक्षावर काय परिणाम होईल?
→ आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद कमी होण्याची शक्यता वाढली आहे.
4. या बैठकीत कोणते प्रमुख नेते उपस्थित होते?
→ अजित पवारांसह अनेक प्रमुख राष्ट्रवादी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
5. आता पुढील पाऊल काय असू शकते?
→ अजित पवार आणखी एक बैठक घेऊन गटबाजी मिटवण्याचा प्रयत्न करू शकतात, मात्र स्थानिक स्तरावरील मतभेद गंभीर आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.