Sharad Pawar-Amarsingh Pandit-Ranveer Pandit Sarkarnama
मराठवाडा

धाकटे पंडितही पोचले गोविंदबागेत; खुद्द पवारांनीच कानमंत्र देत दाखविला गोप्रकल्प!

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमरसिंह पंडीत यांचे पुत्र रणवीर यांनी बारामतीत घेतली शरद पवारांची भेट

Datta Deshmukh

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित (Amarsingh Pandit) यांचा दोन्ही पवारांसोबत (शरद पवार Sharad Pawar, अजित पवार) राबता आहेच. आता त्यांचे चिरंजीव रणवीर पंडितांनीदेखील पवारांच्या गोविंदबागेत एन्ट्री केली आहे. विशेष म्हणजे खुद्द मोठ्या पवारांनीच त्यांना बारामती येथील AIC-ADT या प्रकल्पातील विविध गाई, त्यांच्यापासूनची दूध आणि इतर उपपदार्थ निर्मितीची माहिती दिली. (NCP General Secretary Amarsingh Pandit's son Ranveer meet Sharad Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचे राजकारणाबरोबर शेती, शिक्षण, सहकार, क्रीडा आदी विविध क्षेत्रात उत्तुंग योगदान आणि त्याबद्दल अफाट अनुभवदेखील आहे. राजकारणाव्यतिरिक्त इतर क्षेत्रांत पवारांसोबत सहवास आणि त्या क्षेत्राबाबत पवारांकडून धडे मोजक्याच मंडळींना मिळतात, तसा अनुभव यापूर्वी अनेकदा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी घेतलेला आहे. अगदी पवारांसोबत त्यांनी शेती क्षेत्राच्या अभ्यासासाठी परदेशी वाऱ्याही केलेल्या आहेत. मात्र, आता हे भाग्य त्यांचे सुपुत्र रणवीर पंडित यांनाही मिळाले.

रणवीर पंडित यांनी गुरुवारी (ता. २४ मार्च) वडिल अमरसिंह पंडित यांच्यासोबत बारामतीला जाऊन शरद पवार यांची त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी पवारांनी त्यांची ख्याली खुशाली विचारत शिक्षण व भविष्यातील ध्येयाबाबत विचारपूस केली. रणवीर पंडित यांनी इंग्लंडमधील लिड्स विद्यापीठातून स्पोर्ट विषयात पदवी, तर ऑस्ट्रेलियातील मेलर्बन येथून याच विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतल्याचे सांगितले. त्यावर पवारांनी या शिक्षणाचा महाराष्ट्रातील तरुणांना कसा फायदा होईल, याबाबत धडे देऊन त्यांच्याही कल्पना जाणून घेतल्या.

ग्रामीण आणि निमशहरी भागात क्रीडांगणे असली तरी तांत्रिक क्रीडा शिक्षण देणाऱ्यांची कमतरता असल्याने अशा अकादमी उभारण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच, साखर कारखान्यांमध्ये उपपदार्थ निर्मितीतही लक्ष घालण्याचा कानमंत्र पवारांनी रणवीर पंडित यांना दिला. तसेच, स्वत:च्या गाडीतून पवारांनी बारामती येथील AIC-ADT या प्रकल्पाचीही रणवीर पंडित यांना सैर घडवित तेथील विविध गाई, त्यांच्यापासूनची दूध आणि इतर उपपदार्थ निर्मितीची माहिती दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT