NCP SP Marathwada Candidates: महायुतीपाठोपाठ आता महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 64 उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर झाली.
त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 45 उमेदवारांची पहिली यादी जाही केली आहे. मराठवाड्यातील दहा उमेदवारांचा यात समावेश असून इतर पक्षातून आलेल्यांना संधी देण्यात आली आहे.
अनुभवी, बाहेरून पक्षात आलेल्या तसेच पक्षातील तरुण चेहऱ्यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आले आहे. बीड विधानसभा मतदारसंघाबाबतचा सस्पेंस कायम असून पहिल्या यादीत आमदार संदीप क्षीरसागर यांचे नाव नसल्याने उलटसूलट चर्चांना उधाण आले आहे.
आष्टी मतदारसंघातून तरुण चेहरा मेहबूब शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले लातूर जिल्ह्यातील विनायक पाटील, सुधाकर भालेराव या दोघांनाही अनुक्रमे अहमदपूर, उदगीर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री राजेश टोपे पुन्हा एकदा घनसावंगीमधून लढत आहेत. बदनापूरमधून बबलू चौधरी, भोकरदन- चंद्रकांत दानवे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर मराठवाड्यातील अनेक नेते, आमदरांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. पक्ष फुटीनंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मराठवाड्यात चांगले यश मिळवले.
बीड लोकसभेची जागा जिंकत राष्ट्रवादीने भाजपच्या पंकजा मुंडे यांना धक्का दिला होता. राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली होती.अटीतटीच्या लढतीत सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर पाच हजाराहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता.
लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर मराठवाड्यातही इतर पक्षातून राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झाले होते. लातूर जिल्ह्यातून विनायकराव पाटील, सुधाकर भालेराव, नांदेड जिल्ह्यातील माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माधव पाटील किन्हाळकर यांच्यासह अनेक भाजपच्या नेत्यांनी तुतारी हाती घेतली होती.
पक्षाने यातील पाटील, भालेराव यांना उमेदवारी देत त्यांचा योग्य सन्मान केल्याचे आज जाहीर झालेल्या यादीवरून दिसून येते. राष्ट्रवादीची यादी जाहीर झाल्यानंतर आता मराठवाड्यातील अनेक मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मराठवाड्यातील उमेदवार
1.राजेश टोपे- घनसावंगी
2.जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
3.विनायकराव पाटील- अहमदपूर
4.सुधाकर भालेराव- उदगीर
5.चंद्रकांत दानवे- भोकरदन
6. प्रदीप नाईक- किनवट
7. विजय भांबळे-जिंतूर
8. पृथ्वीराज साठे- केज
9. बबलू चौधरी- बदनापूर
10. मेहबूब शेख- आष्टी
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.