Abdul Sattar-Supriya Sule News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Ncp News : सत्तार बारामतीत, सुप्रिया सुळे म्हणाल्या `अतिथी देवो भव` चे आमच्यावर संस्कार..

Supriya Sule : सत्तार यांच्या बारामती दौऱ्याबद्दल सुप्रिया सुळे काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

सरकारनामा ब्युरो

Marathwada News : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज बारामतीत आयोजित कृषी प्रदर्शनाला हजेरी लावली. उद्धाटक म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. (Ncp) राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल शिवराळ भाषेत टीका केल्यानंतर सत्तार पहिल्यांदाच बारामतीत आले.

यावर सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांना पत्रकारांनी विचारले तेव्हा त्यांनी अत्यंत संयमित प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, (Baramati) बारामती कुणीही आले तरी त्यांचे स्वागतच आहे. अतिथी देवो भव हे आमच्यावर संस्कार आहेत. त्यामुळे जे कोणी येतील त्यांचे आम्ही स्वागतच करू, अशा मोजक्या शब्दात त्यांनी मत व्यक्त केले.

अब्दुल सत्तार यांनी आपल्या सिल्लोड मतदारसंघात एका कार्यक्रमा निमित्त बोलत असतांना सुप्रिया सुळे यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती. त्यानंतर राज्यभरात सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. सत्तारांचा राजीनामा घ्या, या मागणीसाठी अगदी मुंबईत सत्तारांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या महिलांनी आंदोलन केले होते.

केवळ राष्ट्रवादीच नाही, तर महाविकास आघाडीतील काॅंग्रेस, शिवसेना या पक्षांनी देखील सत्तारांनी वापरलेल्या शिवराळ भाषेचा निषेध केला होता. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या बारामती दौऱ्याबद्दल सुप्रिया सुळे काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा, आमच्यावर अतिथी देवो भव चे संस्कार झालेले आहेत. त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागतच आहे, असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले. तर सत्तारांनी देखील कृषी प्रदर्शनात पवार कुटुंबियांचे कौतुक करत ते राबवत असलेल्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचा निश्चितच फायदा होईल, असे मत व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT