Ram Khade Seriously Injured in Deadly Attack sarkarnama
मराठवाडा

Beed Crime Video : शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील राम खाडेंवर जीवघेणा हल्ला; सत्तूर, बंदूक घेऊन 10 ते 12 जण आले अन्...

NCP SP Ram Khade Attack Police : राम खाडे यांच्यावर 10 ते 12 जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Roshan More

Ram Khade News : स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. बीडच्या सीमेवर असलेल्या मांदगावमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. अहिल्यानगर जिल्ह्यातून बीडकडे राम खाडे आपल्या सहकाऱ्यांसोबत जात होते. मांदगावमधील हाॅटेलमध्ये जेवण करून जात असताना तोंडाला रुमाल बांधलेल्या 10 ते 12 जणांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला.

हल्ला करणाऱ्यांच्या हातात सत्तूर, बंदूक होती. त्यांनी गाडीची काच फोडली. राम खाडे यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांना देखील मारहाण करण्यात आली. मात्र, हल्लेखोरांचे मुख्य टार्गेट राम खाडे हेच होते. राम खाडे रक्तबंबाळ होईपर्यंत आरोपींनी हल्ला केला. या हल्ल्यात खाडे हे बेशुद्ध झाले. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

खाडे यांच्यासोबत असलेले सहकारी दीपक खिळे यांनी सांगितले की, हा हल्ला राजकीय हेतून करण्यात आला होता. कारण मागील काही दिवसापासून राम खाडे आणि आम्ही मिळून काही भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली होती. त्यामुळे तालुक्यातील सगळ्यांना माहिती आहे हा हल्ला कोणी घडवून आणला आहे. राजकीयद्वेषातून हा हल्ला करण्यात आला आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

राम खाडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. पळून जाताना हल्लेखोराच्या हातून सत्तूर घटनास्थळी पडला होता. राम खाडे यांच्यासोबत पाच ते सात जण सहकारी असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर देखील हल्लेखोरांनी हल्ला चढवला मात्र आरोपींचे मुख्य टार्गेट खाडे असल्याचे दिसून आले. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

'त्या' घटनेची चर्चा

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात राम खाडे यांच्या घरातील अंगणात लावलेली गाडी चार ते पाच जणांनी पेटवून दिली होती. आष्टी तालुक्यातील हिंदु देवस्थान, तसेच मुस्लिम वफ्तच्या जमीनीमध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार खाडे यांनी केली होती. यातून त्यांच्यावर हल्ला होत असल्याची चर्चा तेव्हा होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT