Mp Supriya Sule News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Ncp : सत्तारांच्या विधानावर सुप्रिया शांत, पती सुळेंनी मात्र व्यक्त केले मत; स्त्री द्वेष्टे पुढारी..

सुळे यांनी सुप्रिया यांचा लढाऊ महिला असा उल्लेख करत त्यांच्या सारख्या इतर स्त्रीया ज्या स्त्रियांचा द्वेष करणाऱ्या पुढाऱ्यांचे खरे रुप, वृत्ती उघड करतात अशा सर्वांच्याच बाबतीत तिरस्करणीय,असभ्य भाषेचा वापर केला जातो, असे म्हटले आहे. (Sadanand Sule)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी टीका केली. याविरोधात राज्यात रान पेटले असून राष्ट्रवादी काॅंग्रेस सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी करत रस्त्यावर उतरली आहे. सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी देखील सत्तार यांच्या वक्तव्याबद्दल ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.

`सर्व स्त्री द्वेष्टे पुढारी त्यांचे खरे रुप आणि वृत्ती उघड करणाऱ्या (Supriya Sule) सुप्रिया आणि अशा सर्व लढाऊ स्त्रीयांबद्दल तिरस्करणीय, असभ्य भाषा वापरत राहतात`, अशा शब्दात सुळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे आज आपल्या सिल्लोड मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सभेसाठी ठाण मांडून बसले आहेत. सभास्थळी भेट देवून पाहणी करत असताना एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सत्तार यांनी ५० खोक्यावरून होणाऱ्या टीकेला उत्तर देतांना सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरले.

ही बातमी संपुर्ण राज्यात वाऱ्या सारखी पसरली आणि त्याचे पदसाद देखील उमटायला लागले. सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केले. मुंबईतील त्यांच्या शासकीय बंगल्य वर दगडफेकीचा प्रकार देखील समोर आला. तर राष्ट्रवादीच्या महिलांनी सत्तारांच्या विरोधात आंदोलन करत केवळ माफी नाही तर त्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी केली.

एवढेच नाही तर चोवीस तासात माफी मागा नाहीतर असाल तिथे तोंडाला काळे फासू, असा इशारा आणि अल्टीमेटम देखील राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे. सत्तार यांच्या विधानानंतर राजकीय वातावरण तापलेले असतांना ज्या सुप्रिया सुळेंवर टीका करण्यात आली त्यांनी मात्र यावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र त्यांचे पती सदानंद सुळे यांनी सत्तारांना खोचक शब्दात सुनावणारे ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सदानंद सुळे आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, `So the mysoginistic leaders continue their tirade against Supriya and by default all women, who stand up to their macho behaviour and expose their character and abilities`. सुळे यांनी सुप्रिया सुळे यांचा लढाऊ महिला असा उल्लेख करत त्यांच्या सारख्या इतर स्त्रीया ज्या स्त्रियांचा द्वेष करणाऱ्या पुढाऱ्यांचे खरे रुप आणि वृत्ती उघड करतात अशा सर्वांच्याच बाबतीत तिरस्करणीय आणि असभ्य भाषेचा वापर केला जातो, असे म्हटले आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT