News of Mla Shirsats Tractor theft
News of Mla Shirsats Tractor theft Sarkarnama
मराठवाडा

MLA Shirsat's Tractor Stolen: आमदार शिरसाटांचा ट्रॅक्टर चोरट्यांनी पळवला..

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : सर्व सामान्यांच्या घरी चोरी झाली तर त्याची फारशी चर्चा होत नाही, पण पोलिसांच्याच घरी किंवा एखाद्या बड्या नेत्याच्या, आमदार, खासदाराच्या घरी चोरी झाली तर त्याची मात्र मोठी चर्चा होते. (News of Mla Shirsats Tractor theft)असाच काहीसा प्रकार सध्या चर्चेत असलेले शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांच्या बाबतीत होत आहे.

आमदार शिरसाट यांच्या मुलीच्या नावावर असलेला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टरच चोरी गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Sanjay Shirsat) शिरसाट यांनी व्यवसायिक वापरासाठी खरेदी केलला ट्रॅक्टर आणि ट्राॅली दोन्ही चोरट्यांनी पळवून नेले. या प्रकरणी शिरसाट यांचे पुत्र माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांच्या फिर्यादीवरून सातारा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल (Fir Filed) करण्यात आला आहे.

चक्क आमदारांचाच ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरीला गेल्याने याची चर्चा होत आहे. ही घटना ३ मे रोजी सातारा परिसरात घडल्याचे समोर आले आहे. (Aurangabad) याप्रकरणात आमदारांच्या मुलाच्या फिर्यादीवरुन ६ मे रोजी सातारा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिद्धांत संजय सिरसाट (वय ३२, रा. १०८, ग्रीन, बी विंग, सातवा मजला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या बहिणीच्या नावावर असलेला महिंद्र कंपनीचे ट्रॅक्टर (क्र. एमएच २० एफयु ८९२६) आणि ट्रॉली (किंमत अंदाजे पाच लाख रुपये) हा तीन मे च्या सायंकाळी पाच ते चार मे रोजी सकाळी नऊ वाजेदरम्यान सातारा परिसरातील तंत्रज्ञ मैदान परिसरातून चोरट्याने पळवला.

सदर ट्रॅक्टर हा सिद्धांत यांच्या बहिणीच्या नावावर असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार धुळे हे करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT