Shivsena Leader Chandrakant Khaire-Bjp Mla Nitesh Rane
Shivsena Leader Chandrakant Khaire-Bjp Mla Nitesh Rane Sarkarnama
मराठवाडा

Nitesh Rane : अरेरे झोंबले.. खैरेंना पुन्हा डिवचले..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादेत काल जाहीर सभा झाली. आम्ही आमचाच रेकाॅर्ड मोडला असा दावा शिवसेनेकडून (Shivsena) केला जात असतांना भाजपकडून एक फोटो व्हायरल करण्यात आला होता. या फोटोमध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) हे काही लोकांसोबत चर्चा करतांना व पैसे देताना दिसत आहेत. हे छायाचित्र ट्विट करत भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना आणि विशेषतः खैरे यांना डिवचले.

गर्दी जमवण्याचा फार्म्युला असे म्हणत राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप खैरे यांच्यावर केला आहे. (Bjp) यावर खवळलेल्या खैरेंनी भाजपच्या लोकांवर अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा इशारा दिला आहे. शिवाय नितेश राणे यांना मी तुमच्या बापाच्या वयाचा आहे, असे म्हणत सुनावले. भाजप किती खालच्या पातळीवर गेली आहे हेच यातून दिसते. पण अशा खोटारडेपणामुळे भाजप कधीच सत्तेत येणार नाही, असा इशारा दिला होता.

आता हा वाद संपला असे वाटत असतांनाच नितेश राणे यांनी पुन्हा खैरे यांना डिवचले आहे. खैरे यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओवर ट्विट करत ` अरेरे झोंबले`, असा टोला लगावला आहे. नितेश राणे यांचा समाचार घेतांना खैरे यांनी कनकवलीत गेलो असता नितेश राणेंला कसा दम दिला होता, याचा किस्सा देखील सांगितला.

आम्ही कनकवलीत गेलो तेव्हा हे आम्हाला आडवे झाले, इकडे यायचे नाही म्हणाले. तेव्हा देखील मी त्याला रस्ता तुझ्या बापाचा आहे का? असा सवाल केला होता. आम्ही मराठवाड्यातील शिवसैनिक आहोत, बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक आहोत, हिसका दाखवू, असा इशारा देखील खैरे यांनी नितेश राणे व भाजपला दिला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी पुन्हा ट्विट करत शिवसेनेला डिवचले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT