Guardian Minister Sandipan Bhumre News Sarkarnama
मराठवाडा

Sandipan Bhumre News : नाराजी नाही, वाद नाही, खेळीमेळीच्या वातावरणात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक..

Marathwada : एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत, त्यांचा आदेश आमच्यासाठी महत्वाचा आहे.

सरकारनामा ब्युरो

Shivsena : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वाद झाल्याच्या बातम्या खोट्या निराधार आहेत. कालची बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. (Sandipan Bhumre News) मंत्रीमंडळ किंवा मंत्र्यांच्या राजीनाम्यावर या बैठकीत कुठलीही चर्चा झालेली नाही. नाराजी नाही, वाद नाही अशा शब्दात रोहयो तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी बैठकीतील वाद झाल्याचा इन्कार केला.

अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. तेव्हापासून सर्वात जास्त अस्वस्थता आणि नाराजी शिंदे (Eknath Shinde) गटात असल्याचे बोलले जाते. (Shivsena) भरत गोगावले, संजय शिरसाट यांच्या बोलण्यातून ती समोरही आली. त्यातच काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या आमदार, खासदार, मंत्र्यांच्या बैठकीत दोन आमदारांमध्ये मंत्रीपदावरून खडाजंगी झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

दोन आमदार एकमेकांवर धावून गेल्याचे देखील सांगितले जाते. संदीपान भुमरे यांनी मात्र असे काहीच घडलेच नसल्याचा दावा केला. (Marathwada) भुमरे म्हणाले, राष्ट्रवादी काॅंग्रेस सत्तेत सहभागी झाल्यामुळे शिवसेना नाराज आहे असे चित्र निर्माण केले जात आहे, पण त्यात तथ्य नाही. मुख्यमंत्र्यांनी काल बोलावलेल्या बैठकीत राज्यातील विकास कामे आणि संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली.

मंत्रीमंडळ विस्तार, कुणाला मंत्रीपद मिळणार? किंवा कुणाचे मंत्रीपद काढून घेतले जाणार का ? यावर कोणतीही चर्चा झाली नाही. राहिला प्रश्न काही मंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगणार या चर्चेचा, तर त्यात कुठलेच तथ्य नाही. मला मुख्यमत्र्यांनी राजीनामा मागितला तर मी क्षणाचाही विलंब न लावता तो देईन. एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत, त्यांचा आदेश आमच्यासाठी महत्वाचा आहे. परंतु अशी कुठलीही चर्चा कालच्या बैठकीत झाली नाही, याचा पुनरुच्चार देखील भुमरे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT