Nanded Political News : काही लोकांना भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना चांगला चाललेला देखवत नाही. अशी मंडळी सातत्याने अडचणी आणण्याचा प्रयत्न करत असतात. (Sugar Factory News) पण अडचणींवर मात करून आम्ही कारखाना चांगला चालवत आहोत. ज्यांना एकही संस्था नीट चालवता येत नाही त्यांनी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्या विषयी बोलू नये, असे खडेबोल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सुनावले.
भाऊराव कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केलेल्या भाषणात त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या उपस्थितीत ही सभा शुक्रवारी (ता २९) पार पडली. कारखान्याची यंदाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली आहे. शेतकऱ्यांनी ऊस लागवडीचे नियोजन कारखान्याच्या नियोजनानुसार करावे.
त्यामुळे ऊस तोडीला अडचण येणार नाही, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासावर मागील ३० वर्षापासून कारखाना व्यवस्थितरीत्या चालू आहे. (Nanded) कारखान्याने आतापर्यंत कोणत्याही बँकेचा एकही हप्ता थकबाकी ठेवलेला नाही, हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांसाठीच काम करेल. (Congress) आत्तापर्यंत शेतकऱ्यांचे हिताचेच निर्णय सभासदांनी घेतले भविष्यातही असेच निर्णय घेतले जातील. ही वास्तू शेतकऱ्यांची आहे हा कारखाना १९९६ पासून व्यवस्थित सुरू आहे.
हा कारखाना चाललाच पाहिजे पण काही लोकांना कारखाना चांगला चाललेला पाहवत नाही. म्हणून सतत अडचणी निर्माण करतात, असा आरोपही चव्हाण यांनी विरोधकांवर केला. कारखाना सांभाळण्याची जबाबदारी प्रत्येक सभासदाची, संचालकाची जेवढी आहे, तेवढीच माझी सुद्धा आहे. कारखान्यात आगाऊ खर्च होणार नाही, संचालक मंडळ चूक करणार नाही.
तुम्ही संचालक मंडळाला बिनविरोध निवडून दिले आहे. तेव्हा ते कारखान्याच्या हिताचेच निर्णय घेतील. आपला कारखाना इतर कारखान्यापेक्षा जास्तीचे भाव देत आहे. ऊसाची लागवड कारखान्याच्या नियोजन नुसार केल्यास शेतात ऊस शिल्लक राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये आणि आपला ऊस इतर कारखान्याला देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.