Bjp Leader Pankaja Munde
Bjp Leader Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

एमआयएम कुणासोबत गेली तरी भाजप स्वबळावर लढणार आणि जिंकणारही..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : एमआयएमच्या महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या प्रस्तावावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी अगदी थोडक्यात प्रतिक्रिया दिली. (Aimim) एमआयएम कुणासोबत जाते यावर खरंतर मी बोलण्याचे काही कारण नाही. त्यांना कुणाबरोबर जायचे ते जावे, आमचं नाणं खणखणीत आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असो की कोणत्याही निवडणूका भाजप (Bjp) स्वबळावर लढवणार आणि जिंकणारही असा, दावा पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केला.

औरंगाबादेत प्रसार माध्यमांनी पकंजा मुंडे यांना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याच्या प्रस्तावबद्दल विचारले. यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, त्यांनी कोणत्या पक्षासोबत जायचे हा त्यांच्या प्रश्न आहे, आम्ही मात्र स्वबळावर लढणार आणि जिंकणारही.

बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच विधानसभेत लक्षवेधी मांडली. पण मी बीड जिल्ह्याची बदनामी करते असा आरोप केला गेला. बीडचा बिहार झाला हे सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने विधानसभेत म्हटले. मी त्या आधीपासून जिल्ह्यातील गुन्हेगारी, माफियागिरीच्या विरोधात आवाज उठवला होता.

राज्याच्या गृहमंत्र्यांनी एसपीवर तातडीने सक्तीची करवाई करत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर उपस्थित केलेल्या प्रश्नावर एका अर्थाने शिक्कामोर्तबच केले. आता या एसपींची बदली करून नवीन नियुक्ती झाली तरच काही आशा आहे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT