Manoj Jarange Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation: 'सरकारचा एकही निर्णय मान्य नाही, आंदोलकांना त्रास देऊ नका अन्यथा...'; जरांगे पाटलांचा इशारा

Manoj Jarange: "तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करू नका. तरुणांवर गुन्हे दाखल झाले तर मी बीडमध्ये जाईल..."

Ganesh Thombare

Jalna News: राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असून, ठिकठिकाणी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. सोमवारी बीड जिल्ह्यात जाळपोळीच्या घटना घडल्या. यानंतर गृहविभागाने जाळपोळ करणाऱ्यांवर ३०७ चे कलम लावण्याचा इशारा दिला.

यानंतर जरांगे पाटलांनी माध्यमांशी बोलताना तरुणांवर गुन्हे दाखल झाले तर मी स्वत: बीडमध्ये जाईल आणि एसपी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसेल, असा थेट इशारा दिला. तसेच "राज्य सरकारचा एकही निर्णय मान्य नाही, अर्धवट प्रमाणपत्र सरकारने वाटू नये, आम्ही अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाहीत, त्यामुळे आज निर्णय घेतला नाही, तर बुधवारपासून मी जलत्याग करणार असून सरकारने विशेष अधिवेशन बोलावं", असेही जरांगे पाटील म्हणाले.

आमचे आंदोलन शांततेत सुरू आहे. आम्हाला त्रास देऊ नये. बीडमध्ये आमचे आंदोलन सुरू आहे, त्यानंतर तुमची संचारबंदी आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका, दिला तर पुढे काय होईल याची जबाबदारी तुमची. तरुणावर खोटे गुन्हे दाखल करू नका. तरुणांवर गुन्हे दाखल झाले तर मी बीडमध्ये जाईल, मग १० लाख मराठा समाज येईल, हे सांगता येत नाही. मग मराठा समाजाची ताकद समजेल, असेही जरांगे पाटील म्हणाले.

दरम्यान, या वेळी जरांगे पाटील यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. एका उपमुख्यमंत्र्यांना काड्या करायची सवय आहे, पण मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर दिले जाईल, तसेच सरकारला ताणायचं असेल तर आम्हीही दाखवूच, उद्यापासून साखळी उपोषण, आमरण उपोषण आणि गावबंदी अशी त्रिसूत्री असणार आहे, असेही जरांगे पाटलांनी सांगितले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT