Chhatrapati SambhajiNagar Breaking News
Chhatrapati SambhajiNagar Breaking News Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati SambhajiNagar Breaking News : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना 'ईडी'ची नोटीस; काय आहे कारण?

सरकारनामा ब्यूरो

Chhatrapati SambhajiNagar : छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना 'ईडी'कडून (ED) नोटीस पाठविण्यात आली आहे. महानगरपालिकेतील पंतप्रधान आवास योजनेच्या निविदेतील गेरव्यवहार प्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे.याचदरम्यान, मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याबाबतचे निर्देशही देण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर( Chhatrapati SambhajiNagar) महानगरपालिका हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेतील 40 हजार घरे बांधण्यासाठी चार हजार कोटी रुपयांच्या बांधकाम निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र, निविदा प्रक्रियेत कंपनीकडून घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. महापालिकेच्या घरकुल बांधणीसाठी निविदा भरताना ‘रिंग’ केल्याचा ठपका ठेवत या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात 19 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात ईडीची एन्ट्री झाल्यानंतर एकाचवेळी संबंधित लोकांवर 9 ठिकाणी धाड टाकण्यात आ्ल्या होत्या. पुढे या प्रकरणात ईडीने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मुंबई कार्यालयात बोलावून त्यांची चौकशी देखील केली. यात महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांचा देखील समावेश आहे.

आता याच प्रकरणात तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय(Astik Kumar Pandey) यांना ईडीकडून नोटीस देण्यात आली आहे. तर पाण्डेय आज मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रक्रियेत अनेक कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. मात्र,यातील काही कंपन्यांकडून अटींचे पालन न करता फसवणूक करण्याच्या प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT