Sudhir Mungantiwar News Sarkarnama
मराठवाडा

Sudhir Mungantiwar News: आता फक्त घोषणा नाही, मराठवाडा विकासाचा कालबद्ध कार्यक्रम तयार..

Sudhir Mungantiwar On Marathwada: अल्प, मध्यम व दीर्घकाळासाठी या योजना असतील. ज्या योजना शक्य आहेत, अशाच योजनांची घोषणा केली जाणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Aurangabad Political News : मराठवाड्यात कृषी, सिंचन, शिक्षण, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला असून, त्याची घोषणा मराठवाडा (Marathwada Political News) मुक्तिसंग्राम दिनानिमित्त होणाऱ्या १७ सप्टेंबरच्या बैठकीत केली जाईल, असे राज्याचे वन व पर्यावरणमंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त यंदा मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (Marathwada) मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे यंदाचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने १६ सप्टेंबरला संपूर्ण मंत्रिमंडळ शहरात येणार आहे. मराठवाड्याच्या विकासाच्या अनुषंगाने मंत्रिमंडळासमोर काय प्रस्ताव असावेत, याची चर्चा आजच्या आढावा बैठकीत करण्यात आली.

अल्प, मध्यम व दीर्घकाळासाठी या योजना असतील. ज्या योजना शक्य आहेत, अशाच योजनांची घोषणा केली जाणार आहे. (Aurangababd) नुसत्या घोषणा न राहता मराठवाड्याचा कालबद्ध विकास झाला पाहिजे, याची काळजी शासन घेणार असल्याचे आश्‍वासन (Sudhir Mungantiwar) मुनगंटीवार यांनी दिले.

१५ ते १७ सप्टेंबरदरम्यान विविध कार्यक्रम, परिसंवाद घेतले जातील. त्यानंतर २६ जानेवारीपर्यंत हे कार्यक्रम सुरू राहतील. उद्‍घाटने, भूमिपूजन, स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण होईल. रंगरंगोटी, सुशोभीकरण केले जाईल, असे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १६ सप्टेंबरला होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिले आहे, हे निमंत्रण अमित शहा स्वीकारतील, अशी आशाही मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT