Pankaja Munde, Bajrang Sonwane Sarkarnama
मराठवाडा

Beed Politics : बीडमध्ये नवा ट्विस्ट; 'ओबीसीं'च्या नेत्याचा 'टॉप गिअर'; पंकजा मुंडे, सोनवणेंना धक्का देणार?

Datta Deshmukh

Beed Lok Sabha Constituency : खासदार प्रीतम मुंडेंचे तिकीट कापून भाजपने पंकजा मुंडेंना बीड लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे, तर महायुतीकडून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे मुंडेंना टफ देणार असे चित्र बीडमध्ये दिसत होते. त्यानंतर मात्र वंचितने आपला उमेदवार दिला. आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे Prakash Shendge यांच्या ओबीसी बहुजन पक्षाने आपलाही उमेदवार बीडच्या मैदानात उतरवला आहे. त्यामुळे बीडमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात असून, याचा फायदा कुणाला होणार, याकडे लक्ष आहे. OBC Bahujan Party Contest T. P. Munde against Pankaja Munde.

पंकजा मुंडे Pankaja Munde, बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांच्यानंतर आता ओबीसी बहुजन पक्षानेही बीड मतदारसंघांमध्ये आपला उमेदवार दिला आहे. ओबीसी आंदोलनामध्ये प्रमुख चेहरा असलेले प्राध्यापक टी. पी. मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये बीडची निवडणूक लढली जाणार आहे. उमेदवारी जाहीर होताच टी. पी. मुंडेंनी पंकजा मुंडे, बजरंग सोनवणेंवर निशाणा साधला.

ओबीसीवर होणारा अन्याय थांबावा, ओबीसीचे OBC प्रश्न संसदेत मांडता यावे, यासाठी ओबीसी बहुजन पक्षाने उमेदवार दिले आहेत. आम्हाला छगन भुजबळांचा आशीर्वाद असल्याचेही टी. पी. मुंडेंनी म्हटले आहे. त्याचबरोबर आम्ही पंकजा मुंडेंना ओबीसी मानत नाहीत. त्यांनी विकास आणला नाही तर भकास केलाय. कुठे आहे रेल्वे, सांगा ? असा सवालही उपस्थित करत टी. पी. मुंडेंनी पंकजा मुंडेंना सुनावले आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे Bajrang Sonwane हे बीडमधील उमेदवार आहेत. त्यांच्यावरही मुंडेंनी निशाणा साधला आहे. बीडमध्ये जाळपोळ झाली आहे. त्यावेळी आमदार व्यावसायिकांनी, स्वतःची घर स्वतः जाळलेत का? असा सवाल उपस्थित करत टी. पी. मुंडेंनी बजरंग सोनवणेंना लक्ष्य केले आहे. चार तगड्या उमेदवारांमुळे बीडची लढत चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT