Navnath Waghmare On Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

Navnath Waghmare On Eknath Shinde : ‘पायातली चप्पल डोक्यावर घेतली’; जरांगेंवरून ओबीसी नेत्याचा थेट एकनाथ शिंदेंना टोला

OBC leader Navnath Waghmare targets Eknath Shinde over Manoj Jarange Patil Mumbai protest warning : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नवनाथ वाघमारेंची सरकारवर टीका; ‘मनोज जरांगे म्हणजे सगळा मराठा समाज नाही’

Pradeep Pendhare

Jarange Patil Mumbai protest : मराठा आरक्षणावरून पु्न्हा एकदा बेमुदत उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी, मुंबई येणारच, आंदोलन करणारच, भाषा बदलणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

जरांगे पाटील यांच्या या भूमिकेवरून ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी थेट एकनाथ शिंदे यांना सुनावले. एकनाथ शिंदे साहेबांनी पायातली चप्पल डोक्यावर घेतली, असा टोला नवनाथ वाघमारे यांनी लगावला आहे.

ओबीसी (OBC) नेते नवनाथ वाघमारे म्हणाले, "मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. पाऊस नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत तात्काळ पावले उचलली पाहिजेत. दुष्काळ जाहीर करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकारने वेळ काढूपणा करू नये. तर राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी. जरांगेंचे आंदोलन म्हणजे, 'रोजच मढ त्याला कोण रड', अशी परिस्थिती आहे."

राज्य सरकारने जरांगे (Manoj Jarange Patil) यांचे कितीही मुके घेतले, तरी तो म्हणणार नाही की मला हे दिले म्हणून. जुन्या काळात पायातले वाहन डोक्यावर घेतले नाही पाहिजे, असे म्हणायचे. राज्य सरकारने पायातली चप्पल पायात ठेवली असती, तर एवढा जरांगेंचा त्रास झाला नसता, असे म्हणताच एकनाथ शिंदे साहेबांनी पायातली चप्पल डोक्यावर घेतली, असा टोला नवनाथ वाघमारे यांनी लगावला.

मराठवाड्यात देण्यात येणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रावर बोलताना, येणाऱ्या काळात चार हजार कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेले पाहायला मिळतील. मनोज जरांगेंकडे राज्य सरकारने दुर्लक्ष करावे, मनोज जरांगे म्हणजे सगळा मराठा नाही, असेही नवनाथ वाघमारे यांनी म्हटले. जरांगे पाटलांचे उपोषण आता राहिलेलं नाही, दररोज पाच ते सात सलाईन घेतल्यानंतर माणसाला काही होत नाही. सलाईन घेतल्यानंतर उपोषण संपलेले असते, असेही वाघमारे यांनी म्हटले.

मुंबईत ओबीसींच्या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. याला परवानगी दिली, तर त्याचा विचार ओबीसी करतील. मुंबईत गेलेल्या मराठा समाजाच्या युवकांवर गुन्हे दाखल झाले, तर जबाबदार कोण? असा प्रश्न वाघमारे यांनी केला.

पायातली चप्पल डोक्यावर घेतल्यावर काय होतं त्याचे उत्तम उदाहरण जरांगे! तीन वर्षांपासून राज्यातील ओबीसी हा त्रास सहन करतोय, त्याचा कोणी विचार केला आहे का? असाही प्रश्न नवनाथ वाघमारे यांनी केला.

SCROLL FOR NEXT