Chhagan Bhujbal Sarkarnama
मराठवाडा

Chhagan Bhujbal News : लाठीचार्जनंतर रोहित पवार, टोपेंनी जरांगेंना मध्यरात्री आणून पुन्हा उपोषणाला बसविले; भुजबळांचा गौप्यस्फोट

Vijaykumar Dudhale

Jalna Latest News : लाठीचार्ज झाल्यानंतर सर्वजण घरात जाऊन झोपले होते. मात्र, आमदार राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी त्याला (मनोज जरांगे पाटील) मध्यरात्री तीन वाजता घरातून आणून उपोषणाला बसविले. ज्येष्ठ नेते शरद पवार भेटीसाठी येणार आहेत, असे त्याला सांगण्यात आले. मात्र, त्यांनी पवारांना खरी माहिती दिलीच नाही, असा गौप्यस्फोट राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज अंबडमध्ये बोलताना केला. (Rohit Pawar, Tope brought Manoj Jarange on hunger strike at midnight: Bhujbal's secret explosion)

जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसींचा महामेळावा झाला. त्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. या वेळी भुजबळ यांनी लाठीचार्जनंतर झालेला पडद्यामागील घटना सांगितली.

पोलिसांकडून झालेला लाठीचार्ज सर्वांनी पाहिला आहे. पण, दगडफेकीत महिला कर्मचाऱ्यांसह ७० पोलिस जखमी झाले होते. जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी पोलिस गेले होते. पण त्यांनी पोलिसांना थोड्या वेळाने येण्यास सांगितले. तोपर्यंत त्यांनी तयारी केली. पोलिस आल्यानंतर त्यांच्यावर दगडांचा मारा करण्यात आला. त्यात ७० पोलिस जखमी झाले, असे भुजबळ यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भुजबळ म्हणाले की, महिला पोलिसांवर हात उचलण्यात आला. त्याचा दवाखान्यात रिपोर्ट आहे. तुम्ही बघा. लाठीचार्ज झाल्यानंतर ते सर्वजण घरात जाऊन झोपले होते. मात्र, रोहित पवार, राजेश टोपे यांनी त्याला मध्यरात्री तीन वाजता घरातून आणून उपोषणाला बसविले. पण, लाठीचार्ज का झाला?, हे त्यांनी पवारांना सांगितलेच नाही. पवारांना आम्ही आजही उत्कृष्ट प्रशासक समजतो, त्यांना हे झालेले प्रकार सांगितले असते तर वेगळा प्रकार झाला नसता. मराठा तरुणांना असलेली सहानुभूती गेली नसते.

लाठीजार्चनंतर घडलेल्या प्रकारामध्ये सर्वांचीच चूक आहे. पोलिस अधीक्षकांचीही चूक झाली. फडणवीसांनी पोलिसांना मारहण झाल्याचे सांगायला पाहिजे होते. देशाच्या पुढे खरे चित्र आलेच नाही. गृहमंत्री फडणवीस माफी मागायला आले. आम्ही बोललो तर आमच्यावर टीका झाली, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

बीडमध्ये काही व्हायचे ते होऊ द्या. प्रकाश सोळुंखे यांचे घर जाळले. एक वाक्य ते बोलले होते. कोयते, चॉपर, पेट्रोल बॉम्ब त्या ठिकाणी सापडले. कोड नंबर देण्यात आले होते. एक नंबर प्रकाश सोळंके, दहा नंबर सुभाष राऊत यांचं हॉटेल, २१ नंबर जयदत्तर क्षीरसागर, २५ नंबर अमरसिंह पंडीत असे कोंड नंबर देण्यात आले होते, असाही गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT