chagan bhujbal, mahadev jankar, vijay vadettivar, pankaja munde, gopchand padalkar sarkarnama
मराठवाडा

Obc Reservation: अंबडमध्ये ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा; भुजबळ, वडेट्टीवार, मुंडेंची हजेरी

Obc Reservation Elgar Sabha In Ambad : सकल ओबीसी भटके विमुक्त जाती समाजाच्या वतीने अंबडमध्ये ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेचे आयोजन केले आहे.

Sachin Waghmare

Obc Reservation: बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. त्यासोबतच बंजारा आणि धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करून अनुसूचित जमातीचे दाखले वाटप करण्यात यावेत, यासाठी राज्यातील ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सकल ओबीसी भटके विमुक्त जाती समाजाच्या वतीने अंबड शहरातील धाईतनगर येथील मैदानावर ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेचे आयोजन केले आहे.17 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता एल्गार सभा होणार आहे. या सभेला ओबीसी समाजातील नेतेमंडळी हजेरी लावणार आहेत.

या एल्गार सभेस मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे, महादेव जानकर, पोहरादेवी गादीचे महंत बाबूसिंग महाराज, आमदार गोपीचंद पडळकर, शब्बीर अन्सारी, माजी आमदार प्रकाश शेंडगे, इंद्रनील नाईक, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश राठोड, प्रा. संदेश चव्हाण, कल्याण आखाडे हे नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या सभेची पूर्वतयारी सकल ओबीसी भटके विमुक्त जाती समाजाच्या वतीने सुरू आहे. या सभेस मोठ्या संख्येने ओबीसी समाज एकत्र येणार असून, गावोगावी बैठका सुरू आहेत. ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात येऊ नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करा

खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी. त्यासोबतच ७ सप्टेंबर २०२३ रोजी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने काढलेला जी. आर. रद्द करावा, बंजारा आणि धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करून अनुसूचित जमातीचे दाखले वाटप करण्यात यावेत. या मागण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती संयोजकांकडून देण्यात आली.

SCROLL FOR NEXT