Nagesh patil Ashtikar News Sarakaranma
मराठवाडा

Nanded: कृष्णा पाटील आष्टीकरांना 'ऑपरेशन टायगर'चा फटका बसणार? नांदेडमध्ये विधानपरिषदेची समीकरणे बदलली

Operation Tiger, Krishna Patil Ashtikar, Nanded MLC Election: ऑपरेशन टायगरनंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पक्षांतराचा फटका नांदेड विधान परिषद निवडणुकीत कृष्णा पाटील आष्टीकर यांना बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसनेही वेगळी भूमिका घेतल्याची चर्चा रंगली आहे.

Jagdish Pansare

MLC Elections: ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा परिणाम मराठवाड्यातील विधानपरिषदेच्या उद्या होणाऱ्या मतदानावर निश्चितच होणार आहे. नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुती भक्कम असताना महाविकास आघाडीने ऐनवेळी काँग्रेसच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कृष्णा पाटील आष्टीकर यांना पुरस्कृत केले. खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि कृष्णा पाटील या पिता पुत्रांनी नांदेड स्थानिक स्वराज्य संस्थान निवडणुकीत विजयाचे दावे आणि मॅजिक फिगर आपल्याकडे असल्याचे सांगत रंगत आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरने कृष्णा पाटील आष्टीकर यांची डोकेदुखी आता वाढली आहे. वडिलांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर कृष्णा पाटील आष्टीकर यांना मदत न करण्याची भूमिका ठाकरेंच्या पक्षासह काँग्रेसनेही घेतली आहे. विधान परिषदेच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना ऑपरेशन टायगर घडल्यामुळे नांदेड मधील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे. मॅजिक फिगरचा दावा करत थेट भाजपचे नेते अशोक चव्हाण आणि महायुतीचे उमेदवार अमर राजूरकर यांना आव्हान देणाऱ्या नागेश पाटील आष्टीकर व त्यांचे सुपुत्र कृष्णा पाटील अष्टीकर यांची आता मोठी अडचण झाली आहे.

नांदेड विधान परिषदेची निवडणूक एकतर्फी असताना काँग्रेसच्या उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांनी माघार घेत कृष्णा पाटील आष्टीकर यांना पुरस्कृत केले. पुरेसे संख्याबळ नसताना आष्टीकर पिता पुत्रांनी आम्ही नांदेडच्या शेअर मार्केटमध्ये बूम करायला आलोय असे म्हणत विजयाचा दावा केला होता. रामदास पाटील सुमठाणकर यांच्या माघारीमुळे आधीच काँग्रेस पक्षात नाराजीचा सूर होता. त्यात आता खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरली आहे.

त्यांच्या या निर्णयामुळे मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांची वाट बिकट झाली आहे. ऑपरेशन टायगरमध्ये वडिलांचे नाव येताच कृष्णा पाटील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत मी उद्धव ठाकरे सोबतच आहे, महाविकास आघाडीतच आहे असे सांगत निवडणुकीत पाय रोवून उभा असल्याचे सांगितले. मात्र दिल्लीत घडलेल्या ऑपरेशन टायगरच्या घडामोडीनंतर काँग्रेसने नांदेडच्या निवडणुकीत वेगळी भूमिका घेण्याचा म्हणजेच आष्टीकर यांच्या पाठीशी न राहण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ऑपरेशन टायगर आणि त्यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव आल्यामुळे महायुतीच्या पथ्यावर हे पडणार असे दिसते. मॅजिक फिगर आणि नांदेडच्या शेअर बाजारात बुम करण्यासाठी आल्याचा अष्टीकर पिता पुत्रांचा दावा ऑपरेशन टायगरमुळे आता फोल ठरणार असे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT