औरंगाबाद : जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत चांगलीच रंगत येऊ लागली आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्या. (Bjp) यात कॅबिनेटमंत्री, राज्यमंत्र्यासह आमदारांची इच्छुकांना माघारीसाठी गळ घालतांना चांगलीच दमछाक झाली. (Mla Haribhau Bagde)काही अंशी या प्रयत्नांना यश येऊन १४ पैकी सात संचालक बिनविरोध निवडले गेले. (Abdul Sattar)
पण दुध संघात आमदार हरिभाऊ बागडे यांना विरोध कायम असल्याचे यावेळीही दिसून आले. त्यामुळे त्यांना बिनविरोध निवडून आणण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात आले. त्यामुळे आता सात जागांसाठी मतदान होणार आहे. या सात जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात आहे. बुधवारी (ता.१२) उमेदवारांनी चिन्हाचे वाटप करण्यात आले.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी ९९ अर्ज आले होते. त्यापैकी २५ अर्ज अवैध ठरले. तर उर्वरित ७४ जागांपैकी मंगळवारी (ता.११) ५३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तर ७ उमेदवार बिनविरोध झाले. त्यामुळे रिंगणात १५ उमेदवारांत थेट लढत होणार आहेत. २२ जानेवारीला मतदान होणार असून २३ मतमोजणी आणि निकाल जाहीर होईल.
जिल्ह्यातील ३४६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आमदार हरिभाऊ बागडे यांच्यासह माजी संचालक गोकुळसिंग राजपूत, संदीप बोरसे, कचरू डिके, शीलाबाई कोळगे,अलका रमेश पाटील-डोणगावकर आणि पुंडलिकराव काजे हे रिंगणात आहेत. सात जागांसाठी उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले.
यात प्रामुख्याने पतंग, कपबशी, आणि विमान या चिन्हाला उमेदवारांनी पसंती दिली. निवडणुकीत दोन पॅनल समोरासमोर असणार आहे. त्यामुळे पतंग विरुद्ध कपबशी असा सामना पहायला मिळणार आहे. दरम्यान, जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत दूध संघाचे माजी उपाध्यक्ष नंदलाल काळे यांनी त्यांची जागा कायम राखली आहे.
त्यांच्यासह माजी संचालक रांजेद्र जैस्वाल, सविता अधाने, श्रीरंग साळवे, दिलीप निरपळ, सुमित्रा चोपडे,इंदूबाई सुरडकर हे संचालक बिनविरोध झाले आहेत. यातील काही संचालकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.