Rana Patil-Bharti Pawar-Sujeetsingh Thakur
Rana Patil-Bharti Pawar-Sujeetsingh Thakur 
मराठवाडा

Osmanabad : केंद्रीय मंत्र्यांसमोरच भाजपतील जुन्या नव्यांचा वाद ; ठाकूर समर्थक दौऱ्यापासून अलिप्त..

सरकारनामा ब्युरो

उस्मानाबाद : भाजपच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार या सध्या उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आहेत. (Osmanabad) या दौऱ्यात त्या बैठका आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहे, असे असतांना जिल्ह्यात मात्र नव्या-जुन्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा वाद उफाळून आला आहे. (Bjp) भाजपचे आ्मदार सुजीतसिंह ठाकूर यांच्या समर्थकांनी डाॅ. पवार यांच्या दौऱ्यापासून अंतर राखल्याचे यावेळी दिसून आले.

तर दुसरीकडे या संपुर्ण दौऱ्यात तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील (Ranajagjeetsingh Patil) व त्यांच्या समर्थकांचीच गर्दी अधिक दिसली. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्र्यांसमोरच जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे. या वादातूच डाॅ. भारती पवार यांच्या दाैर्‍यात जुन्या भाजप नेत्यांनी दांडी मारल्याचे बोलले जाते.

नव्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांना या दौऱ्यात सन्मान मिळाला पण जुनी लोक अंतर ठेवून राहिल्याने भारती पवार यांच्या दौऱ्याची फारशी चर्चाच झाली नाही. दोन दिवसाच्या या दौर्‍यात जिल्हाध्यक्ष व आमदार राणाजगजीतसिंह यांचाच प्रभाव दिसुन आला. भाजपचे आठ प्रदेश कार्यकारीणी सदस्य असुनही पदाधिकारी मेळाव्यात या पैकी एक जणच उपस्थित होता. तो देखील राणा पाटलांच्या जवळचा असल्याने त्याला व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली.

संघटनात्मक बैठकीलासुध्दा पदाधिकारी येत नसल्याने नेमकं अंर्तगत काय राजकारण होतय याचा अंदाज येत आहे. भाजप अंतर्गत गटबाजी आणि नाराजी अशा पद्धतीने चव्हाट्यावर आल्यानंतर त्याची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे. पदाधिकारी मेळाव्यात डाॅ.पवार यांच्या बरोबरीन व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष वगळता एकही पदाधिकारी नसल्याने संघटनेचा प्रोटोकॉलही नव्या नेत्यांकडून पाळला गेला नसल्याचे दिसून आले.

जुना व नवा असा वाद अजुनही शमलेला नाही. जुन्यापैकी काहीनी पक्षात नव्याने आलेल्यांच बोट धरुन राजकारण सुरु केले, पण अधिकतर कार्यकर्ते त्यांच्यापासुन अंतर ठेवुन असल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे. आमदार सुजीतसिंह ठाकुर यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे ते काहीसे अलिप्त असले तरी संघटनेमध्ये त्यांचा आजही दबदबा कायम आहे.

काही दिवसापुर्वी माजी मंत्री पंकजा मुंडे जिल्ह्यात आल्या होत्या, त्यावेळी ठाकुर आवर्जुन उपस्थित राहिले होते. पण केंद्रीयमंत्री जिल्ह्यात येऊनही त्यांनी दोन दिवसाच्या कोणत्याच कार्यक्रमात हजेरी लावली नाही. नव्या व जुन्या नेत्यामधील वाढलेली ही दरी कमी होणार की मग आणखी वाढणार? हे लवकरच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT