MLA will sit on hunger strike news, Osmangabad Sarkarnama
मराठवाडा

Osmanabad : अभ्यंगस्नानाच्या दिवशीच आमदार बसणार आमरण उपोषणाला..

येणाऱ्या हंगामाचेही पिकसुध्दा आता घेणे शक्य होणार नाही, त्यामुळे सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणीही घाडगे पाटील यानी केली. (Osmanabad Shivsena)

सरकारनामा ब्युरो

उस्मानाबाद : शेतकऱ्यांना दिवाळीला पिकविमा, अनुदानाती रक्कम मिळणार म्हणून आशेवर ठेवणाऱ्या सरकारविरोधात दिवाळीच्या पहिल्यादिवशी अभ्यंगस्नान करून सोमवारपासून (ता.२४) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार कैलास घाडगे पाटील हे आमरण उपोषणास बसणार आहेत.

जोवर शेकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळणार नाहीत, तोपर्यंत मी उठणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Kailas Ghadge Patil) माझ्या शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी साजरी करण्याची स्थिती नाही. (Osmanabad) त्यामुळे मी देखील दिवाळी साजरी न करता त्यांच्या न्यायहक्कासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

खरीप २०२० च्या पिक विम्याबाबत सर्वोच्च न्यायालयात निर्णय होऊनही विमा अजुनही मिळालेला नाही. शिवाय ५३१ कोटीपैकी फक्त २०० कोटीवर बोळवण करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. त्यामुळे सरसकट ५३१ कोटी रुपयांची तरतुद करण्यासाठी राज्य सरकारने कंपनीला बाध्य करावे.

५३१ कोटीचे वाटप करतानाही त्यामध्ये काही छुपी कपात करु नये, खरीप २०२१ च्या पिकविम्याचा विचार केला तर अजुनही पिकविमा कंपनीकडुन जवळपास चारशे कोटी रुपये येणे अपेक्षित आहे.

याबाबत राज्य सरकार नुसती बघ्याची भुमिका घेत आहे, यासाठी पुन्हा न्यायालयीन लढा देऊन शेतकऱ्यांनीच विमा मिळवुन घ्यायचा का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आताच सरकारने कठोर भुमिका घेऊन राहिलेली विम्याची पन्नास टक्के रक्कम देण्यासाठी कंपनीला भाग पाडावे, अशी मागणी देखील आमदार घाडगे पाटील यानी केली.

यंदाच्या सप्टेंबरमध्ये शेतीपिकाचे अतिवृष्टी, सततचा पाऊस, ढगफुटी, रोगराईमुळे नुकसान झालेल्या दोन लाख शेतकऱ्यांना २४८ कोटी रुपये तत्काळ देण्यात यावेत. चालु हंगामात सातत्याने पडलेल्या पावसाने व किडरोगाने संपुर्ण पिकच हातचे गेलेले आहे. शिवाय येणाऱ्या हंगामाचेही पिकसुध्दा आता घेणे शक्य होणार नाही, त्यामुळे सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणीही घाडगे पाटील यानी केली.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे १२०० कोटी रुपये शासनाने द्यावे, म्हणून आपले हे आमरण उपोषण आहे. ही रक्कम मिळत नाही तोपर्यंत आपण आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT