Omraje Nimabalkar-Rana Patil News, Osmanabad Sarkarnama
मराठवाडा

Osmanabad Politics : राणापाटील ओमराजेंना बाळ का म्हणाले ?

Osmanabad : वयाच्या ३२ व्य वर्षी राज्यमंत्रीपद भूषवलेल्या राणा पाटलांचा राजकीय अनुभव दांडगा आहे.

सरकारनामा ब्युरो

Osmanabad News : जिल्ह्याच्या राजकाणात विरुद्ध दिशेला तोंड असलेले नेते म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर आणि तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील. Osmanabad नात्याने चुलत भाऊ असले तरी या दोघांमधून विस्तव देखील जात नाही. त्याला कारण म्हणजे १३ वर्षांपुर्वी घडलेली एक घटना.

ओमराजे निंबाळकर यांचे वडिल स्व. पवनराजे निंबाळकर यांची १३ वर्षांपुर्वी हत्या करण्यात आली होती. या हत्ये प्रकरणी त्यांचे चुलत बंधू पद्मसिंह पाटील यांच्यासह इतरांवर आरोप करण्यात आले होते. तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. (Omraje Nimabalkar) वडिलांच्या हत्येमागे पाटील कुटुंब असल्याचा आरोप झाल्यापासून या दोन्ही घराण्यांमध्ये कमालीची दरी निर्माण झाली. (Ranajagjeetsingh Patil) पुढे ती निंबाळकर पाटील घराण्यातील दुसऱ्या पिढीमध्ये देखील दिसून आली.

वडिलांच्या हत्येनंतर ओमराजे निंबाळकर यांनी जिल्ह्यातील राजकारणात आपली पकड मजबूत करायला सुरूवता केली. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत ओमराजे यांनी आपला एक मोठा चाहता वर्ग संपुर्ण जिल्ह्यात निर्माण केला. तर पद्मसिंह पाटील यांची राजकीय धुरा त्यांचे पुत्र राणाजगजीतसिंह पाटील हे गेल्या कित्येक वर्षापासून समर्थपणे सांभाळत आहेत.

वयाच्या ३२ व्य वर्षी राज्यमंत्रीपद भूषवलेल्या राणा पाटलांचा राजकीय अनुभव दांडगा आहे. गेली कित्येक वर्ष राज्याच्या राजकाणात वर्चस्व आणि कायम घरात मंत्रीपद बघितलेल्या राणा पाटलांसमोर ओमराजे तसे नवखे म्हणून ओळखले जातात. जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी ओमराजे व राणापाटील यांनी कधीच सोडली नाही.

काल जिल्हाधिकारी कार्यालायत शेतकऱ्यांच्या पीक विमा प्रश्नाच्या बैठकीत हे दोघे आमने-सामने आले अन् या दोघांमध्ये भडका उडाला. ओमराजे हे जिल्हाधिकाऱ्यांना आम्हाला बैठकीला का बोलावले नाही? याचा जाब विचारत असतांना यात आमदार राणापाटलांनी उडी घेतली आणि वादाची थिनगी पडली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न कित्येक महिन्यांपासून गाजतो आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करत आहे. या मुद्यावरून राणापाटील आणि ओमराजे हे दोघेही आपापल्यापरीने राजकारण करत आहेत. श्रेयवादाच्या लढाईतूनच बैठकीत दोघांमध्ये वाद निर्माण झाला. ओमराजे यांचा बाळ, बाळा असा उल्लेख राणा पाटील यांनी केल्यामुळे ते चांगलेच संतापले.

अर्थात जिल्ह्याच्या खासदाराबद्दल अशी भाषा पाटलांनी वापरणे योग्य नव्हतेच. त्यामुळे ओमराजेंकडून प्रतिक्रिया उमटणे सहाजिक होते. मग संस्कृती, औकात अशा शब्दांचा भडीमार झाला. या दोघांच्या वादात शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न मात्र बाजूला पडल्याचे चित्र होते.

जिल्ह्याच्या राजकारणात ओमराजे-राणा पाटील हे एकमेकांवर नेहमीच आरोप-प्रत्यारोप करतांना दिसतात. हा त्यांचा राजकारणाचा भागच म्हणावा लागेल. परंतु काल जाहीर घडलेल्या प्रकारामुळे भविष्यात देखील ओमराजे-राणापाटील यांच्यातील संघर्ष असाच सुरू राहणार हे स्पष्ट झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT