लातुर : लातुरात (Latur) मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णाचा पॉझिटिव्हीटी रेट हा वाढत असून आता 3.63% झाला आहे. ही कोरोना विषाणूच्या (Corona Virus) तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे. असे लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी ( Pruthviraj B.P) यांनी सांगितले. तसेच, नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले. तर, दुसरीकडे निलंगा तालुक्याचे उपविभागीय अधिकारी शोभा जाधव (Shobha Jadhav) यांनी 100 % लसीकरण न करून घेणाऱ्या शाळांची संच मान्यता रद्द करणार असल्याची तंबी दिली आहे.
जगात कोरोनाची धास्ती असतानाच ओमिक्रॉन (Omicron) या नव्या कोरोना व्हेरिएंटची धास्ती प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांनी घेतली आहे मागील काही दिवसांपूर्वी लातुर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा फक्त 0.5% होता त्यात वाढ होऊन तो आता 3.63% झाला आहे त्यामुळे लातुरात तिसऱ्या लाटेची सुरुवात झाल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी सांगितले आहे नागरिकांनी हा व्हेरिएंट सौम्य आहे असं समजू नये प्रत्येक नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घ्यावे कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन लातुरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी केले आहे.
शासनानं 15 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे लातूर जिल्ह्यातील काही शाळा आरोग्य विभागाशी सहकार्य करत 100% लसीकरण करण्याच्या कार्य करत आहे परंतु पंधरा ते अठरा वयोगटातील पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याच्या मोहिमेत अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांची उदासीनता दिसून येते म्हणून उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी 100 टक्के लसीकरण न करणाऱ्या शाळांच्या संच मान्यता रद्द करण्याची तंबीच आता थेट मुख्याध्यापकांना दिली आहे यातून प्रत्येक शाळातील पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना लस मिळेल आणि कोणाच्या संकटापासून आपण मुलांचा बचाव करणं शक्य होऊ शकेल, असे उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.