Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis News  Sarkararnama
मराठवाडा

Devendra Fadanvis On Karnataka : आमचा रेट इतरांपेक्षा चांगला, कधी जिंकतो कधी हरतो...

सरकारनामा ब्युरो

Marathwada : निवडणुकांध्ये हार-जीत ही होतच असते, कधी आम्ही जिंकतो, तर कधी हरतो. पण निवडूण येण्याचा आमचा रेट इतर पक्षांपेक्षा चांगला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) विजयावर प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान मोदींवर अजूनही विश्वास असल्याचा दावा देखील फडणवीस यांनी केला.

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राजपूत समाजाच्या महाअधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे शहरात आले होते. चिकलठाणा विमानतळावर माध्यमांनी त्यांना कर्नाटक राज्यातील निवडणूक निकालासंदर्भात विचारले असता फडणवीस यांनी भाजपची कामगिरी चांगलीच होती, आमची मते किंचितच कमी झाली असे सांगितले.

निवडणुका होतात काही वेळा आम्ही जिंकतो आणि काही वेळा हारतो, मात्र आमचा निवडून येण्याचा रेट सर्वात जास्त आहे. (Bjp) याच कारण मोदींवर लोकांचा विश्वास आहे. कधीकधी स्थानिक ठिकाणी अशा अडचणी तयार होतात, ज्यामुळे एखाद्या निवडणूकीत पराभव स्वीकारावा लागतो. (Marathwada) उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी केला होता असे विधान वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

या संदर्भात विचारले असता मुनगंटीवार काय बोलले हे आपण ऐकले नाही असे म्हणत फडणवीसांनी उत्तर देणे टाळले. ज्या ठिकाणी भाजपला जिंकायचं असतं त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन बदलल्या जातात आणि त्यामुळे भाजपला तिथे चांगलं बहुमत मिळतं असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. यावर यापेक्षा मोठा मूर्खपणा काय असू शकतो, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

असे असते तर कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असता का? मग भाजपने तिथे हे का केले नाही ? काही लोकांना मुर्खासारखे बोलायची सवय झाली आहे. त्यांना माझा सल्ला आहे, त्यांनी उगाच आपलं डोक आपटू नये, आमच्या पराभवाचं विश्लेषण आम्ही करू, ते करण्यासाठी आम्हाला दुसऱ्या कोणाची गरज नाही, असा टोला देखील फडणवीसांनी आव्हाडांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT